शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू योजनेचे ३५ कोटी वीजबिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:59 IST

टेंभू योजनेची सध्या ३५ कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. टंचाई काळात टंचाई उपाययोजना निधीमधून दिलेल्या आवर्तनाची १५ कोटी, तर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या उसबिलातून कपात करून घेतलेली ५ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी येणेबाकी आहे.

ठळक मुद्देटेंभू योजनेचे ३५ कोटी वीजबिल थकीत टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज

प्रताप महाडिक कडेगाव : टेंभू योजनेची सध्या ३५ कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. टंचाई काळात टंचाई उपाययोजना निधीमधून दिलेल्या आवर्तनाची १५ कोटी, तर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या उसबिलातून कपात करून घेतलेली ५ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी येणेबाकी आहे.वीजबिलाच्या ८१:१९ फॉर्म्युल्याप्रमाणे ८१ टक्के वीजबिलाची रक्कम राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून मिळते. त्यामुळे उर्वरित १५ कोटी रुपये वीजबिल भरण्याची व्यवस्था होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.या महिन्यात टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज भासणार आहे.

सध्या अस्तरीकरण आणि बंद पाईपलाइनची कामे वेगात सुरू आहेत. आवर्तन सुरू केले तर, ही कामे बंद ठेवावी लागतील. यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल, पण आवर्तन अखंडित देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.टेंभू योजनेच्या आवर्तनातून कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी व सांगोला तालुक्यातील जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांना पाणी मिळणार आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाला आहे. अजूनही विहिरी आणि तलावांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु केवळ टेंभू योजनेवर अवलंबून असलेल्या शेतीपिकांना लवकरच आवर्तनाचे पाणी द्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित शेतकरी आवर्तन कधी सुरू होणार, याबाबत अधिकाºयांकडे विचारणा करीत आहेत. परंतु संबंधित शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSangliसांगली