शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

चापकटर खरेदीत १८ लाखांचा अपहार

By admin | Updated: April 30, 2016 00:53 IST

रणधीर नाईक : पहिली निविदा रद्द करण्यापूर्वीच तिसरी निविदा

सांगली : जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून ८० लाखांच्या चापकटर खरेदीमध्ये कृषी विभाग आणि खरेदी समितीने निविदांचा गोलमाल केला आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे १७ लाख ८६ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. यास खरेदी समिती आणि खातेप्रमुख जबाबदार आहे, असा आरोप सदस्य रणधीर नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाचीही चौकशी करण्यासाठी राज्य शासनाच्या चौकशी समितीकडे कागदपत्रे देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, २०१५-१६ वर्षासाठी कृषी विभागाने चापकटर खरेदीसाठी पहिली निविदा २३ आॅक्टोबर २०१५ रोजी प्रसिध्द केली होती. त्यानंतर ३० आॅक्टोबर रोजी शुध्दीपत्रक काढून तांत्रिक दुरुस्त्या केल्या. पुन्हा ७ नोव्हेंबर २०१५ रोजी तिसरे शुध्दीपत्रक काढून पहिल्याप्रमाणेच अटी असतील असे जाहीर करण्यात आले. २१ डिसेंबर २०१५ रोजी निविदा उघडल्यानंतर अर्णव, ओंकार, त्रिमूर्ती आणि महाराष्ट्र आदी पुरवठादारांची नावे होती. यापैकी तीनजणांच्या निविदा पात्र असून अर्णवची निविदा सर्वात कमी दराची म्हणजे प्रतिनग चापकटर १६ हजार ४०० रूपयांची होती. त्यांच्याशी खरेदी समितीने चर्चा करून १६ हजार ३०० रूपयांना निविदा निश्चित केली. दि. २ फेब्रुवारीरोजी कृषी विभागाने त्यांना चापकटर यंत्र पाहणीसाठी दि. ८ फेब्रुवारीपर्यंत देण्याची सूचना दिली. तरीही पुरवठादाराने चापकटर दाखविण्यासाठी न दिल्यामुळे दुसरे स्मरणपत्र दि. २३ फेब्रुवारीरोजी दिले. दि. २४ फेब्रुवारीरोजी संबंधित पुरवठादाराने निविदा प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे सांगितले.पहिल्या निविदा प्रक्रियेचा गोंधळ चालू असतानाच दि. ६ डिसेंबर २०१५ रोजी फेरनिविदा काढली. याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिसरी निविदा दि. ६ जानेवारी २०१६ रोजी काढली असून त्याची मुदत दि. १९ जानेवारीपर्यंत होती. यामध्ये पाच निविदा दाखल होत्या. त्यापैकी परीक्षित, सुदर्शन आणि श्री कृपा या पुरवठादारांच्या निविदा पात्र झाल्या.पहिल्या निविदेत असणाऱ्या नियमामध्ये कोणताही तिसऱ्या निविदेत बदल नाही. तरीही पहिल्या निविदेची प्रक्रिया चालू असताना तिसरी निविदा काढण्याची गरज काय होती, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे. तिसरी निविदा दि. १० फेब्रुवारीरोजी उघडली. यामध्ये परीक्षित आणि सुदर्शन या दोन पुरवठादारांच्या सारख्या किमतीच्या निविदा होत्या. दोघांनीही प्रतिनग २२ हजार ९०० रूपयांची निविदा भरली होती. यामुळे दि. २९ फेब्रुवारीरोजी खरेदी समितीने दोघांना चर्चेसाठी बोलविल्यानंतर दर २१ हजार रूपये निश्चित झाला. त्यामुळे दोघांना समान प्रमाणात पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. या पुरवठादारांनी ज्या कंपनीचे चापकटर पुरवठा करण्याची हमी दिली आहे, त्याच कंपनीचे चापकटर पुरवण्यासाठी अर्णव यांनी १६ हजार ४०० रूपयांनी निविदा भरली होती. त्यांना या दराने कसे परवडत होते? तसेच सध्या बाजारातून चापकटरचे दरपत्रक घेतले असता, १६ हजाराचेच आहे. कृषी विभागाचे खातेप्रमुख आणि खरेदी समितीने ठराविक पुरवठादाराला चापकटरचे काम मिळाले म्हणून मनमानी पध्दतीने निविदा प्रक्रिया राबविली आहे. पहिली निविदा आजअखेर रद्द झाली नसताना नव्याने तिसरी निविदा प्रक्रिया कशी आणि कुणाच्या आशीर्वादाने सुरु केली? यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी आणि खरेदी समितीमधील अधिकाऱ्यांनी प्रतिनग ४७०० रूपयेप्रमाणे १७ लाख ८६ हजाराचे आर्थिक नुकसान केले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी करणार आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचा आटापिटा : भोंगळ कारभारअधिकाऱ्यांनी एकाच वस्तूची एकाच वेळी निविदा प्रक्रिया चालू कशी ठेवली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चापकटरची पहिली निविदा प्रक्रिया २३ आॅक्टोबर २०१५ ते २९ एप्रिल २०१६ अखेर चालू आहे. ही प्रक्रिया अद्याप रद्द झालेली नाही. अर्णवने २४ फेब्रुवारीरोजी चापकटर पुरवठ्यास नकार देऊन तसे पत्र कृषी विभागाला दिल्याने त्यानंतर दुसरी, तिसरी निविदा प्रक्रिया चालू राहिली पाहिजे होती. परंतु, अधिकाऱ्यांनी दुसरी ६ डिसेंबर २०१५ आणि तिसरी ६ जानेवारी २०१६ रोजी सुरु केली. तिसरी प्रक्रिया ३ मार्च २०१६ रोजी संपली असून दोन खरेदीदारांना पुरवठा आदेश देण्यात आला. पूर्वीची निविदा रद्द न करता हा आटापिटा अधिकाऱ्यांनी का केला आहे, असा आरोपही नाईक यांनी केला.