शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

वार्षिक योजनेचे १७४ कोटी ७५ लाख खर्च

By admin | Updated: April 3, 2015 00:35 IST

उद्दिष्ट पूर्ण : ७५ लाख रुपये शिल्लक; खर्चाची टक्केवारी ९९ टक्क्यांवर

सांगली : जिल्हा नियोजन समितीसाठी चालू आर्थिक वर्षात १७५ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यामधील ५० कोटीहून अधिक रुपये महिन्याभरात खर्च करण्याचे आव्हान नियोजन समितीपुढे होते. यात समितीला यश आले आहे. ३१ मार्चअखेर १७४ कोटी ७५ लाख रुपये विकास कामांवर खर्च झाले आहेत. याची टक्केवारी ९९.८६ टक्के आहे. समितीचे २५ लाख, तर नेते आर. आर. पाटील यांच्या आमदार फंडाचे ५० लाख असे एकूण ७५ लाख रुपये मात्र अखर्चित राहिले आहेत. २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १७५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या वर्षात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे नियोजन समितीच्या सभा चार ते पाच महिने होऊ शकल्या नाहीत. या काळात आचारसंहिता लागू झाल्याने चार ते पाच महिने वाया गेले. त्यामुळे मंजूर निधी मोठ्याप्रमाणात अखर्चित राहिला होता. मार्च महिन्यातच ५० कोटीच्या आसपास निधी अखर्चित राहिला होता. नियोजन समिती अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ते नियोजन करुन मार्चअखेर १७४ कोटी ७४ लाखांचा निधी खर्च केला आहे. यावर्षीचे उद्दिष्ट ९९.८६ टक्के इतके पूर्ण करण्यात आले आहे. नियोजन समितीमधील २५ लाखांचा निधी व आर. आर. पाटील यांच्या आमदार फंडातील ५० लाख रुपये मात्र शिल्लक राहिले आहेत. आर. आर. पाटील आजारी पडले, त्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा विकास निधी शिल्लक राहिला आहे. शासनाचे म्हणणे घेऊन हा निधी खर्च करण्यात येणार आहे. वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजनेत गेल्या पाच वर्षात जवळपास दुपटीपर्यंत वाढ शासनाने केली आहे. २००९-२०१० या आर्थिक वर्षामध्ये ९९ कोटी १३ लाख ३० हजाराची तरतूद शासनाने केली होती. यावर्षी ती १७५ कोटींची करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)ननियोजन समितीने यावर्षी ९९.८६ टक्के निधी खर्चाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. निवडणुकांमुळे खर्चामध्ये गती कमी झाली होती. योग्यप्रकारे नियोजन झाल्यामुळे विकास कामांवर निधी खर्च झाला. यासाठी सदस्यांचे सहकार्य लाभले आहे. आता पुढील वर्षासाठीचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. - प्रमोद केंभावी, जिल्हा नियोजन अधिकारी, सांगली.