शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १७ लाख कर्मचारी १४ मार्चपासून संपावर; राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत निर्णय 

By अशोक डोंबाळे | Updated: February 21, 2023 19:22 IST

राज्यातील १७ लाख कर्मचारी १४ मार्चपासून संपावर जाणार असून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे. 

सांगली : राज्य सरकारने नवीन अंशदान पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील १७ लाख शासकीय कर्मचारी, शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या आंदोलनाच्या तयारीसाठी दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृह सेवेतील कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पुणे विभागाचे सचिव पी.एन. काळे यांनी दिली.

काळे पुढे म्हणाले की, जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांची अतिशय जिव्हाळ्याची मागणी आहे. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक झाली आहे. या बैठकीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक दगडे, सरचिटणीस विश्वास काटकर, सांगली जिल्हाध्यक्ष जे.के. महाडिक, कार्याध्यक्ष डी.जी. मुलाणी, एस.एच. सूर्यवंशी, संजय व्हनमाने, गणेश धुमाळ, शिक्षक समितीचे बाबासाहेब लाड, जुनी पेन्शन हक्क समितीचे अध्यक्ष अमोल शिंदे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, जि.प. कर्मचारी संघटनेचे सागर बाबर, जि.प. कर्मचारी महासंघाचे जयसिंग लोणकर आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जुन्या पेन्शनबाबत राज्य सरकारने १४ मार्चपूर्वी निर्णय घेण्याची गरज आहे, अन्यथा दि. १४ मार्चपासून राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद, शिक्षकांसह सर्व शासकीय कार्यालयातील राज्यातील १७ लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. जाहिरनाम्यात जुनी पेन्शन असेल तरच मतदानलोकप्रतिनिधींना निवडून आल्यानंतर आयुष्यभर जुनी लागू केली जाते. मग, त्यांनाही नवीन अंशदायी पेन्शन का लागू केली नाही, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच जो राजकीय पक्ष आपल्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात जुनी पेन्शन देण्याची हमी देतील, अशा पक्षांनाच मतदान करण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला आहे, असेही पी.एन. काळे म्हणाले.

 

टॅग्स :SangliसांगलीGovernment Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप