शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील बेडग येथील १५० आंबेडकरी कुटुंबांनी गाव सोडले, न्यायासाठी मुंबईकडे लॉग मार्च; जाणून घ्या नेमकं प्रकरण

By संतोष भिसे | Updated: July 18, 2023 17:21 IST

पालकमंत्री, खासदारांचा प्रशासनावर दबाव

मिरज : बेडग (ता. मिरज) येथील आंबेडकरी समाजातील सुमारे १५० कुटुंबांनी मंगळवारी गाव सोडून मुंबईकडे कुच केली. निळ्या ध्वजांसह महिलादेखील मोठ्या संख्येने लॉंग मार्चमध्ये सहभागी झाल्या आहेत. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना करणार आहेत.बेडगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीने एक महिन्यांपूर्वी जमीनदोस्त केली. यामुळे ग्रामपंचायत विरुद्ध आंबेडकरी समाज असा संघर्ष सुरु आहे. ग्रामपंचायतीने कमानीसाठी परवानगी दिली होती. मात्र, ती बेकायदा असल्याचे ठरवून १६ जून रोजी कमान पाडून टाकली. जिल्हाभरातील आंबेडकरी जनतेने याचा तीव्र निषेध केला. कमान पाडल्यापासून गावातील वातावरण धगधगते असून वार-प्रतिवार सुरु आहेत. गेल्या आठवड्यात मिरजेत समाजाची बैठक झाली. त्यामध्ये निर्णायक आंदोलनाचा निर्णय झाला. मंत्रालयावर लॉंग मार्च काढण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी सकाळीच मोठ्या संख्येने आंबेडकरी महिला-पुरुष निघाले आहेत. काही वाहनांमध्ये महिला, मुले व आंदोलकांच्या साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ठोस निर्णय मिळाल्याशिवाय गावाकडे परतायचे नाही या भूमिकेतूनच आंदोलक मुंबईसाठी रवाना झाल्याचे दिसून आले. कमान पाडणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाईसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले होते, मात्र प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त समाजाने थेट गाव सोडण्याचाच निर्धार केला. त्यानुसार लॉंग मार्च सुरु झाला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बैठक घेऊन तोडग्याचा प्रयत्न केला, पण तोडगा निघाला नाही. आंदोलकांनी मुलेबाळे, अंथरुण-पांघरुण, कपडे व संसारोपयोगी साहित्यासह गाव सोडले आहे. भर पावसात त्यांची पायपीट सुरु झाली आहे. 

मिरजेत निळे वादळबेडगमधून दुपारी बाराच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात जथ्था गावाबाहेर पडला. त्यावेळी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त होता. दुपारी तीन वाजता आंदोलक मिरजेत पोहोचले. निळे ध्वज फडकवत महिला, मुले अग्रभागी होती.  

पालकमंत्री, खासदारांचा प्रशासनावर दबावग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे, त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे व खासदार संजय पाटील प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आरोप आंदोलकांचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला. ते समाजबांधवांवर अन्याय करत असल्याची तक्रार केली. खाडे यांचे मंत्रीपद काढून घेण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. आमरण उपोषण सुरू केल्यानंतर जनसुराज्य वगळता कोणत्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना भेटण्याचीही तसदी घेतली नसल्याचे डॉ. कांबळे म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज