शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

फुटबॉल संघाच्या निवडीसाठी ज्योतिषाला चक्क १५ लाख रुपये दिले!

By संतोष भिसे | Updated: September 19, 2023 16:15 IST

महासंघाचे तत्कालीन पदाधिकारी कुशल दास यांनी याची जाहीर कबुली दिली आहे. 

सांगली : कुंडली पाहून फुटबॉल संघाची निवड करणारे राष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक ड्रगोर स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. कुंडली पाहण्यासाठी ज्योतिषाला दिलेल्या १५ लाख रुपयांची नुकसान भरपाई स्टीमक आणि भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांकडून वसूल करून घ्यावी अशीही मागणी अंनिसतर्फे डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, फारुख गवंडी आदींनी केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, स्टीमक यांनी आशिया चषक पात्रता फेरीच्या सामन्याच्या दोन दिवस अगोदर संघाची संपूर्ण माहिती भूपेश शर्मा नावाच्या ज्योतिषाला दिली होती. त्यानुसार शर्मा याने प्रत्येक खेळाडूच्या ग्रहस्थितीनुसार अंतिम संघात कोण खेळणार? याचे निर्णय सांगितले. महासंघाचे तत्कालीन पदाधिकारी कुशल दास यांनी याची जाहीर कबुली दिली आहे. 

अंनिसने म्हटले आहे की, ज्योतिष विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते छद्म विज्ञान आहे. ग्रह, गोल, ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा अशास्त्रीय गोष्टींचा वापर करुन संघ निवडणे चुकीचे आहे. जीवापाड मेहनत करणाऱ्या खेळाडूंच्या कर्तृत्वावर अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे.प्रसिद्धीपत्रकावर डॉ. संजय निटवे, वाघेश साळुंखे, सुजाता म्हेत्रे, डॉ. शंकर माने, सचिन करगणे, रवी सांगोलकर, सुनील भिंगे यांच्याही सह्या आहेत.

एकीकडे चंद्रयान आणि दुसरीकडे ज्योतिषडॉ. दाभोलकर यांनी म्हटले आहे की, शासनाने ज्योतिषासारख्या अवैज्ञानिक गोष्टीचा अभ्यासक्रमात समविष्ट करण्याचा प्रकार चालवला आहे, त्यामुळेच त्यांना शासनाची मान्यता मिळत आहे. जन्मवेळ, कुंडली अशा अवैज्ञानिक गोष्टींचे समाजात स्तोम माजत आहे. हे समाजासाठी घातक आहे. एकीकडे चंद्रयान पाठविण्यासारखे विज्ञानवादी उपक्रम राबविले जात असताना फुटबॉल संघासाठी ज्योतिष पाहणे म्हणजे शुद्ध थोतांड आहे.

टॅग्स :Footballफुटबॉल