फोटो : आष्टा येथे लोकमान्य संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष महावीर आवटी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सत्यजित वग्यानी, महंमद रफिक लतीफ, महावीर कुकडे, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. संस्थेला ३१ मार्च २०२१ अखेर ८१ लाख ७ हजार नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष महावीर आवटी यांनी संस्थेच्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
संस्थेचे संचालक डॉ. सत्यजित वग्यानी, उपाध्यक्ष महंमद रफिक लतिफ, मुख्य व्यवस्थापक महावीर कुकडे, आप्पासाहेब वग यांची प्रमुख उपस्थिती होती.
महावीर आवटी म्हणाले की, संस्थेचे भाग भांडवल एक कोटी ९० लाख, ठेवी ५५ कोटी ४८ लाख, कर्जे ३६ कोटी ४७ लाख आहेत.
मोहम्मद रफिक लतिफ यांनी अहवाल वाचन, तर मुख्य व्यवस्थापक महावीर कुकडे यांनी विषयवाचन केले. डॉ. सत्यजित वग्यानी यांनी स्वागत केले. यावेळी शिवाजीराव शिंदे, संजय कोले, डॉ. अभयकुमार झिनगे, दत्तात्रेय सोकाशी, गीता महाजन, सुशीला हेरले, सन्मती बिरनाळे, आदी उपस्थित होते. पद्मजा वग्यानी व मुख्याध्यापिका माधुरी पाठक यांनी सूत्रसंचालन केले. गीता महाजन यांनी आभार मानले.