शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

corona cases in Sangli : वाळवा, मिरज तालुक्यात ५४ दिवसांत १४ हजार कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:56 IST

corona cases in Sangli : सांगली जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपर्यंत आहे. याला ग्रामिण भागातील अनियंत्रित फैलाव कारणीभूत ठरला आहे. मिरज, जत, वाळवा आणि तासगाव तालुके रुग्णसंख्येत आघाडीवर आहेत. प्रशासनासाठी ही बाब चिंतेची ठरली आहे.

ठळक मुद्देवाळवा, मिरज तालुक्यात ५४ दिवसांत १४ हजार कोरोना रुग्णकवठेमहांकाळ, जत, तासगावमध्ये पुरेशा आरोग्य यंत्रणेचा अभाव

संतोष भिसे सांगली : जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपर्यंत आहे. याला ग्रामिण भागातील अनियंत्रित फैलाव कारणीभूत ठरला आहे. मिरज, जत, वाळवा आणि तासगाव तालुके रुग्णसंख्येत आघाडीवर आहेत. प्रशासनासाठी ही बाब चिंतेची ठरली आहे.या चार तालुक्यांचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. १ एप्रिलपासून दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर महापालिका क्षेत्रात तुलनेने रुग्णसंख्या कमी राहिली. ग्रामिण भाग मात्र झपाट्याने बाधित होत गेला. कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाल्याने संख्या वाढली. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर नियंत्रण न राहिल्याने संसर्ग फैलावला.

दुसऱ्या लाटेच्या ५४ दिवसांत वाळवा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७ हजार २७ रुग्ण सापडले आहेत. मिरज तालुक्यात ६ हजार ९१० तर जतमध्ये ६ हजार ८६३ रुग्ण आढळले आहेत. खानापूर तालुक्यात ५ हजार ८९७ रुग्ण झाले आहेत.घरगुती विलगीकरणातील रुग्ण बेजबाबदारपणे वागत असल्याने गावोगावी संस्थात्मक विलगीकरण सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.शाळा आणि आरोग्य केंद्रांत सोय करण्यास सांगितले आहे. काही गावांनी घरगती विलगीकरणातील रुग्मांनी संस्थात्मक विलगीकरणात न आल्यास गुन्हे दाखल करण्याचे इशारे दिले आहेत. सुपर स्प्रेडर ठरु पाहणारे छुपे रुग्ण बाहेर आल्याने फैलाव नियंत्रणात राहील अशी अपेक्षा आहे.१ एप्रिलपासूनच्या दुसऱ्या लाटेतील तालुकानिहाय रुग्ण असे : कंसात मृत्यूआटपाडी ४७७१ (४०), जत ६८६३ (९२), कडेगाव ४१९६ (६२), कवठेमहांकाळ ३३६८ (५१), खानापूर ५८९७ (१२९), मिरज ६९१० (१५३), पलूस २५५१(६६), शिराळा ३०३१(४२), तासगाव ४९४७(११६), वाळवा ७०२७ (१७३), महापालिका क्षेत्र ९१५८ (२७६).शेतवस्तीचे बुरुज ढासळलेशेतातील वस्त्या गावापासून दूर असल्याने पहिल्या लाटेत कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहिल्या होत्या. दुसऱ्या लाटेतही कोरोना फिरकणार नाही या आत्मविश्वासात रहिवासी बेजबाबदारपणे वागले. मात्र हा अतिआत्मविश्वास नडला. शेतवस्त्यांवरील सुरक्षेचे बुरुज ढासळले. गेल्या दोन महिन्यांत शेतवस्त्यांवर कुटुंबेच्या कुटुंबे कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत.कवठेमहांकाळ, जत, तासगावमध्ये पुरेशा आरोग्य यंत्रणेचा अभावकवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पुरेशा आरोग्य यंत्रणेचा अभाव आहे. पुरेशी कोविड रुग्णालये, केअर सेंटर्स, संस्थात्मक विलगीकरण कक्ष, कर्नाटकातून येणाऱ्या रुग्णांची नाकेबंदी याबाबतीत स्थिती चांगली नाही. लोक घरातच राहून उपचार घेत असल्यानेही संसर्ग वाढत आहे. 

घरगुती विलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणाला प्राधान्य देत आहोत. ग्रामपंचायती व कोरोना दक्षता समित्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. या केंद्रांसाठी कोणताही विशेष खर्च होणार नसल्याने अडचण यायचे कारण नाही. विशेषत: शाळांच्या इमारतीत केंद्रे सुरु केल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल.- जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली