शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: १४ शिक्षकांच्या निलंबनाचा प्रस्ताव : कुरळप आश्रमशाळा अत्याचार प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 14:09 IST

कुरळप (ता. वाळवा) येथील आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचारप्रकरणी समाजकल्याण विभागाने शाळेतील १४ शिक्षकांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे.

ठळक मुद्दे मिनाई संस्थेची मान्यता रद्द करण्याबाबतही कार्यवाही सुरू

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचारप्रकरणी समाजकल्याण विभागाने शाळेतील १४ शिक्षकांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. दरम्यान, या शाळेची मान्यता रद्द करण्याबाबतही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील शाळेसह शिक्षकांचे भवितव्य अंधारमय झाले आहे.

मिनाई आश्रमशाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी शुक्रवारी सलग तिसºया दिवशी गावातील वातावरण तणावपूर्ण होते. आश्रमशाळेस पुणे येथील भटक्या विमुक्त जाती-जमाती इतर मागासवर्ग कल्याण संचालनालयाचे संचालक एस. एन. अहिरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी समाजकल्याणचे सहआयुक्त सचिन कवले यांना, संस्था रद्दबाबत व कर्मचारी निलंबनाबाबत शासनास फेरप्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या.

आश्रमशाळेस भेट देणाºया अधिकाºयांना संस्थापक अरविंद पवार हा आर्थिक बळावर थोपवत असल्याचे दिसून आले. शाळेस भेट दिलेल्या अधिकाºयांनी शेरेबुकात नोंद करताना, शालेय वातावरण चांगले असल्याची, तसेच वसतिगृहातील मुला-मुलींची वैद्यकीय तपासणी केल्याची खोटी नोंद केली आहे. जर या अधिकाºयांनी खरी वस्तुस्थिती मांडली असती, तर मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण त्याचवेळी समोर आले असते. मात्र तसे न झाल्याने पैशाच्या जोरावर नराधम पवार याने सर्वच अधिकाºयांना गप्प केल्याचे समोर आले आहे. 

आश्रमशाळेतील घडलेल्या लैंगिक प्रकाराविषयी माहिती घेण्यासाठी आलेले संचालक अहिरे यांच्यासमोर प्रत्येक शिक्षकाने नराधम अरविंद पवार याच्या दंडुकेशाहीचा पाढा वाचला. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाºयांमध्ये त्याच्या असणाºया दहशतीविषयी माहिती देत ते रडू लागले. दरम्यान, त्याचवेळी एका शिक्षिकेला रडता-रडता चक्कर आल्याने सर्वांची पळापळ झाली. त्यानंतर शिक्षकांनी मांडलेली ही वस्तुस्थिती शासनास पाठविण्याची सूचना संचालक अहिरे यांनी समाजकल्याण आयुक्त कवले यांना केली.

दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करीत असताना त्यांनी उपविभागीय अधिकारी किशोर काळे, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना योग्य तपास करण्याच्या सूचना दिल्या. 

‘समाजकल्याण’ची खरडपट्टीबाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. स्वरदा केळकर यांनी शुक्रवारी कुरळप  येथील आश्रमशाळेस भेट दिली. आश्रमशाळेत अनुचित प्रकाराबद्दल केळकर यांनी सहाय्यक आयुक्त  सचिन कवले यांना नोटीस काढून खरडपट्टी केली. आयोगाच्यावतीने अधिक्षक व संस्थेला नोटीसाही बजाविल्या. या प्रकरणातील  दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रम पाटील, इस्लामपूर माजी नगरसेवक विजय कुंभार, व्ही .टी. पाटील, सतीश पाटील, संजय जाधव उपस्थित होते.

 

 

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक