शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचन योजनेतून 130 तलाव भरले : अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:02 IST

दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त मागणीनुसार 159 तलावांपैकी 130 तलाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यातून भरून घेतले आहेत. उर्वरित तलाव भरून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी  येथे दिले.

ठळक मुद्देउपसा सिंचन योजनेतून 130 तलाव भरले : अभिजीत चौधरीदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पाणी टंचाई आढावा

सांगली  : दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त मागणीनुसार 159 तलावांपैकी 130 तलाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यातून भरून घेतले आहेत. उर्वरित तलाव भरून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी  येथे दिले.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, पाटबंधारे विभागाचे विविध विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वश्री ना. शं. करे, सु. मा. नलवडे, प्रशांत कडुसकर, वि. पां. पाटील, सं. कु. पवार, प्र. रा. पाटील, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जे. सोनावणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत उपसा सिंचन योजनांमधून भरून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून 159 तलाव भरून घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी सद्यस्थितीत 130 तलाव भरून घेण्यात आले आहेत. उर्वरित तलाव भरून घेण्याची कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महाराष्ट्र जलसंपत्ती नियंमन प्राधिकरण यांनी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 च्या कलम 8 (1) नुसार सांगली जिल्ह्यात अल्पपर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच पुढील काळात सद्य स्थितीत असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

त्याकरिता विविध उपसा सिंचन योजनांद्वारे सोडण्यात येणारा पाणीसाठा आरक्षित करण्याच्या संदर्भात जत तालुक्यातील 14 जलसाठ्यामधील, मिरज, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, तासगाव तालुक्यांतील 61 जलसाठ्यांमधील आणि आटपाडी तालुक्यातील 11 जलसाठ्यांमधील पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पाणी आरक्षित केले आहे, त्या ठिकाणी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून पाणी उपसाबंदी करण्याची कार्यवाही करावी. तसेच, सर्व कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तलाव तपासून घ्यावेत व तसा अहवाल सादर करावा, असे त्यांनी सूचित केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली