शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

सांगलीतील तुंगच्या जात पंचायतीचे १३ पंच न्यायालयात हजर, कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 19:43 IST

आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला म्हणून तुंग (ता. मिरज) येथील पांडूरंग तमाण्णा चौगुले-नंदीवाले यांच्या कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले नंदीवाले जात पंच शुक्रवारी न्यायालयात शरण आले.

सांगली, दि. 15 - आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला म्हणून तुंग (ता. मिरज) येथील पांडूरंग तमाण्णा चौगुले-नंदीवाले यांच्या कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले नंदीवाले जात पंच शुक्रवारी न्यायालयात शरण आले. चार दिवसापूर्वी त्यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. शंकर यल्लाप्पा चौगुले, रावसाहेब शंकर चौगुले, पांडूरंग लक्ष्मण चौगुले, गजानन राजाराम चौगुले, शिवाजी राजाराम चौगुले, दिलीप श्रीपती चौगुले, सोपान लक्ष्मण चौगुले, ज्ञानदेव लक्ष्मण चौगुले, अशोक ज्ञानदेव चौगुले, विलास शिन्नाप्पा चौगुले, आप्पासाहेब शिन्नाप्पा चौगुले, महेश तुकाराम चौगुले, नितीन तुकाराम चौगुले, (सर्व रा. नंदीवाले वसाहत, तुंग) अशी न्यायालयात शरण आलेल्या नंदीवाले जात पंचायतीच्या पंचांची नावे आहेत. पांडूरंग चौगुले यांनी दहा वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला होता. त्यामुळे नंदीवाले जात पंचायतीने चौगुले कुटूंबास समाजातून बहिष्कृत करुन त्यांना वाळीत टाकले होते. त्यांना समाजातील धार्मिक कार्यक्रम, लग्न तसेच कोणाचे निधन झाले तरी बोलाविले जात नव्हते. जात पंचायतीने या कुटूंबाचे जगणे मुश्किल करुन सोडले होते. कोणीही नातेवाईक व समाजातील व्यक्ती त्यांच्याशी संबंध ठेवत नव्हते. गेली दहा वर्षे हे कुटूंब अपमानित होऊन जगत होते. जात पंचायतीच्या त्रासामुळे त्यांना गाव सोडण्याची वेळ आली होती. जात पंचायतीच्या या अन्यायाविरुद्ध पाडूरंग चौगुले यांनी अंधश्रद्धा निर्मृलन समितीच्या समितीकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार अंनिसचे कार्यकर्ते राहूल थोरात, संजय बनसोडे, प्रा. सतीश चौगुले, अवधूत कांबळे, अजय भालकर, प्रा. अनंतरकुमार पोळ यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांची भेट घेऊन चौगुले कुटूंबावर गेली दहा वर्षे झालेल्या अन्यायाची माहिती दिली. तसेच राज्य शासनाने नुकताच पारित केलेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत नंदीवाले जात पंचायतीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. अंनिसच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तुंग गावाला भेट देऊन चौकशी केली. ग्रामस्थांकडून माहिती घेतली. त्यानंतर जात पंचायतीच्या १३ पंचाविरुद्ध सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी सर्व संशयित न्यायालयात हजर झाले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :Courtन्यायालय