शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

१२६ प्राणांतिक वाहन

By admin | Updated: December 1, 2014 00:06 IST

चौपदरीकरणाची मागणी : जिल्ह्यात घडलेल्या अपघातानंतर बोध घ्या

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्ह्यातील इतर मार्गांवर झालेल्या १२६ प्राणांतिक वाहन अपघातात १४३ जणांचा मृत्यू झाला. मुंबई - गोवा महामार्गावर सर्वाधिक ७६ अपघात झाले असून, त्यात ९२ जणांना प्राण गमवावा लागल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या महामार्गाचे लवकरात लवकर चौपदरीकरण होण्याची मागणी सुरू झाली आहे.राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अरुंद पूल, अरूंद रस्ते तसेच तीव्र चढ-उतारांबरोबरच धोकादायक वळणे, रस्त्यावर असलेले खड्डे यामुळे या रस्त्याची माहिती नसलेल्या तसेच बेदरकारपणे वाहने हाकणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१४ या दहा महिन्यांत झालेल्या ७६ अपघातात ७० पुरुष व २२ महिला मिळून ९२ जणांचा मृत्यू झाला, तर ७९ अपघातात २४० पुरुष व ६५ महिलांसह ३०५ जण गंभीर जखमी झाले. ९१ अपघातांत ४८९ जण किरकोळ जखमी झाले. राज्य महामार्गावर याच दहा महिन्यात झालेल्या १४ अपघातात १२ पुरुष व २ महिलांसह १४ जणांचा मृत्यू झाला. २५ अपघातात ४५ पुरुष व १० महिलांसह ५५ जण गंभीर जखमी झाले. याच कालावधीत राज्य महामार्गावर ८ अपघातात २३ जण किरकोळ जखमी झाले. दहा महिन्यांत ३६ अपघातात ३५ पुरुष व २ महिलांसह ३७ जणांचा बळी गेला. ६० अपघातात ९४ पुरुष व २६ महिलांसह १२० जणांना प्राणास मुकावे लागले. भीषण अपघाताला कारणीभूत...मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दहा महिन्यात झालेल्या भीषण अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. मात्र, चौपदरीकरणाचे कवित्व सुरूच आहे. रस्ते अपघात का घडतात, कसे घडतात, त्यातून संबंधित शासनप्रणालीने या विषयात गंभीर दखल घेऊन यावर योग्य उपाय योजले पाहिजेत. रस्त्यावरील भीषण अपघातानंतर मागे उरलेले सत्य आपण पाहतो. मात्र, हे सत्य जबाबदारी का स्वीकारीत नाहीत, असा प्रश्न विचारला जात असला तरी महामार्गावरील अनेक कारणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. अनेक नेत्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या घोषणा केल्या. मात्र, त्या कमी प्रमाणात येत आहेत. कोकणी माणसाने यापूर्वी रेल्वेचे स्वप्न पाहिले, अथक प्रयत्नांनंतर व सततच्या रेट्यानंतर ते सत्यात उतरले आहे. आता चौपदरीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र, हे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न ज्याच्या तोंडी कायम आहे. अधिकारी, पत्रकार, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी यात जातीने लक्ष घालायलाच हवे, असे मत आता व्यक्त होत ्आहे. पाच वर्षातील अपघातवर्ष अपघात मृत्यू20099481232010957169201196814920129011602013145 662014126143सावर्डे - येथे सन २००९मध्ये पाचजण ठार झाले होते. खेडमध्ये २०१० साली झालेल्या लक्झरी बस व कार अपघातात दहाजणांचा बळी बळी गेला, तर नोव्हेंबर २0१२मध्ये नीता ट्रॅव्हल्सच्या गाडीला सावर्डे येथे झालेल्या अपघातात सहाजण दगावले होते. देवळे अपघातात पाचजण मृत्यूमुखी पडले होते.