शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
4
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
5
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
6
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
7
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
8
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
10
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
11
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
12
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
13
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
14
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
15
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
16
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
17
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
18
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
19
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
20
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे

गस्त घालणाऱ्या ११ तरुणांना अटक

By admin | Updated: August 4, 2015 00:04 IST

सांगलीत कारवाई : गस्तीच्या नावाखाली दहशत भोवली; तलवार, लोखंडी गज, काठ्या जप्त

सांगली : चोरांना पकडण्यासाठी गस्तीच्या नावाखाली हातात शस्त्रे घेऊन दहशत माजविणाऱ्या गस्त पथकांतील तरुणांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. रविवारी रात्री हनुमाननगर, लिमये मळा, शंभरफुटी, गावभाग व विश्रामबाग परिसरात जाऊन दहशत माजवून हुल्लडबाजी करणाऱ्या ११ तरुणांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तलवार, लोखंडी गज, काठ्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये अशोक रामगोंडा सिद्धरेड्डी (वय २३), नितीन मल्लिकार्जुन म्हेत्रे (२२), रवी सुभाष गायकवाड (१९), लाडजी मखबूल सनदी (२८, चौघे, रा. हनुमानगर, सांगली), बंदेनवाज हुसेन आत्तार (२६), महादेव कृष्णा धोटुडे (५५), इरफान आयुब शेख (२२), आयुब मौला शेख (४०, चौघे, रा. शंभरफुटी रस्ता, सांगली), सदाशिव उत्तम बाळ (३०, किसान चौक), दैवत रमेश जाधव (२३, गावभाग, सांगली) व निरंजन कल्याण आडके (२१, विश्रामबाग) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध शांतता भंग करणे, हुल्लडबाजी करणे, दहशत निर्माण करणे, बेकायदा हत्यार बाळगणे, अफवा पसरविणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेश व गडचिरोली येथील तीन हजार गुन्हेगारांनी जिल्ह्यात शिरकाव केल्याची अफवा पसरल्याने गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात गस्त सुरू आहे. गस्तीचे हे लोण शहरातही पसरले आहे. पण गस्तीच्या नावाखाली त्यांची दहशत सुरूआहे; तसेच स्वत:ची गल्ली सोडून ते अन्य भागांत जाऊन दहशत माजवीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. रविवारी रात्री पोलिसांनी शोधमोहीम राबविली. त्यावेळी हे अकरा तरुण दुचाकीवरून ट्रिपल सीट जाताना आढळून आले. त्यांची हुल्लडबाजी सुरू होती. त्यांच्याकडे शस्त्रेही होती. त्यांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)पोलिसांनी घेतल्या बैठकापोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांनी सोमवारी शहरातील हनुमाननगर, लिमये मळा व आप्पासाहेब पाटीलनगरमध्ये रहिवाशांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कायदा हातात घेऊ नये, पाचपेक्षा जादा लोकांनी गस्त घालू नये, हत्यारे बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, संशयित कोणी आढळून आल्यास त्यास पकडून पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.