लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील शिवाजीराव पाटील आप्पा नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्चअखेर ४१ लाख ५२ हजार रुपये ढोबळ नफा झाला तसेच मार्चअखेर शंभर टक्के कर्ज वसुली झाली, अशी माहिती संस्थेचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा शहरातील सर्वसामान्य गोरगरीब होतकरू तरुणांना आर्थिक आधार देऊन रोजगाराची संधी निर्माण केली. संस्थेने विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
संस्थेच्या ठेवी १२ कोटी २१ लाख, कर्ज वाटप १० कोटी ८५ लाख गुंतवणूक २ कोटी ७५ लाख, १०० टक्के कर्जवसुली झाली असूल भागभांडवल ६८ लाख २५ हजार,राखीव व इतर निधी ५५ लाख १० हजार असून संस्थेला मार्चअखेर ४१ लाख ५२ हजार नफा झाला आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे, उपाध्यक्ष केशव माळी, राजू पाटील, जैद देवळे, प्रदीप ढोले ,दीपक शिंदे ,सचिव सुनील पाटील ,अविनाश विरभद्रे, सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते