बोल्टच्या विंडिज संघाला शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 19:34 IST
उसेन बोल्टने ट्विटरवर महिला आणि पुरुष खेळाडूंना शुभेच्छा देणारा व्हिडियो पोस्ट केला आहे.
बोल्टच्या विंडिज संघाला शुभेच्छा
भारताला सेमिफायनलमध्ये हरवून टी-20 क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारून कॅरेबियन खेळाडूंनी सर्वांनाच अचंबित केले. जबरदस्त खेळ, हरफनमौला डान्स आणि गेल यामुळे वेस्ट इंडिजचा संघ प्रसिद्ध आहे.आता फायनलमध्ये इंग्लंडला हरवून नवा इतिहास रचण्यासाठी विंडजचे खेळाडू सज्ज झाले आहेत. त्यांच्या उत्साह वाढविण्यासाठी जगातील सर्वात वेगवान मानव उसेन बोल्टदेखील पुढे सरसावला आहे.त्याने ट्विटरवर महिला आणि पुरुष खेळाडूंना शुभेच्छा देणारा व्हिडियो पोस्ट केला आहे. तो म्हणतो, महिला आणि पुरुष क्रिकेट संघाना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. मला पूर्ण खात्री आहे की, तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार.यंदाच्या टी-20 क्रिकेट विश्वकप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी फायनलमध्ये मुसंडी मारली आहे. महिला संघाने तर आॅस्ट्रेलियाला नमवून वर्ल्डकपवर नाव कोरले आहे.आता पुरुष संघ इंग्लंडला हरवून डबल धमाका करतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. }}}}