शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

चुकीचं वागायला मुलं शिकतात कुठून? पालकांकडून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 16:32 IST

मुलांना नाती शिकवणं, पैशाची किंमत समजू देणं हे पालक करतात का?

ठळक मुद्देमुलांना आपण काय दाखवतो, ते काय बघतात यावरही त्यांच्या वाढीचे अनेक प्रश्न अवलंबून असतात.

-योगिता तोडकर

एका कॉलेजमध्ये पेरेंट्स मीट अर्थात पालकसभा होती. तिथे मला समुपदेशक म्हणून बोलावलं होतं. सगळा कार्यक्र म संपल्यावर काही मंडळी आणि मी असं अनेक विषयांवर बोलणं सुरु होतं. चर्चेला मोकळं वातावरण मिळाल्यावर एका मुलाची आई म्हणाली ही आजकालची मुलं कपडे बदलल्यासारखे बॉय फ्रेण्ड, गर्ल फ्रेंड बदलतात. नशीब आपलं, घरी आपल्याशी बोलतात तरी. एका मुलाचे वडील म्हणाले, अहो माझा मुलगा मी वापरतो तसेच सगळं त्याला वापरायचं असत. देव कृपेने आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यामुळे मी त्याला घेऊन देतो. पण या वयात हे ब्रॅण्डचं वेड. कसं करावं. मी त्यांना म्हटलं मंडळी हे सगळं वागायला मुलं कुठून शिकत असतील? सगळे म्हणाले शिकवायला कशाला लागत आजूबाजूला दिसत आणि  हे तेच करतात. मी त्यांना म्हटलं घराबाहेर दिसण्यासाठी घरातून पाऊल बाहेर ठेवल्यावर बाहेरच दिसतं. तोपर्यंत आधी आपल्या घरात काय चालू आहे हे मुलं शिकतात. आपल्यापैकी किती जण मुलांना नाती सांभाळायला शिकवतो. आपले किती नातेवाईक मुलांना माहित असतात? कोणत्याही नातेवाईकांच्या कार्यक्र मांना मुलांना आपण नेणं गरजेचं समजतो का?  नेमकं अशा ठिकाणी आपण त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य  देतो. उलट आपण तिथे कौतुकाने सांगतो तो आता मोठा झालाय ना, त्यामुळे मित्र मैत्रिणींच्यात व्यस्त असतो. बर ही  मुलं आपल्याबरोबर आली तरी आपल्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसतात. नाती जपण्यासाठी संभाषण होणं गरजेचं असतं हे कुठे आपण त्यांना दाखवून देतो. घरी आल्यावर आपल्याकडून  त्या कार्यक्र मामध्ये काय छान  गोष्टी समोर आल्या, कोणाचं कौतुक याऐवजी काहीतरी नकारात्मत्मक चर्चा जास्त होतात. या सगळ्यातून मुलं नाती जपायला शिकणार कशी? आणि मग त्यांनी गर्ल फ्रेण्ड,  बॉय फ्रेण्ड  कपड्यासारखे बदलले  तर ? त्यांच्या नात्यासंबंधी निर्णयाच्या  दिशा, आपण त्यांना काय दाखवतोय त्यांच्या समोर नाती कशी जपतोय यावर पूर्णपणे अवलंबून आहे. ब्रँड वापरण्याबद्दल बोलायचं झालं तर, आपणच तर ब्रँडेड च्या आहारी गेलेलो असतो. आपण मुलांना फिरायला कुठे घेऊन जातो, मॉल मध्ये. मोकळ्या हवेत अथवा जिथे मुलं नवीन काही शिकतील अशा ठिकाणी आपणच त्यांना नेत नाही. तो जेंव्हा पहिल्यांदा  ब्रँडेड काही मागतो तेंव्हा आपल्याला कौतुकच वाटतं. मग नंतर त्नास होतो. पहिल्यांदाचा त्याला, त्याने काय मागितलं आहे. त्याची किंमत किती आहे. ते पैसे कमावण्यासाठी किती कष्ट पडतात याची जाणीव आपण त्यांना करून देतो का? आधी आईसक्रि मची सवय लावल्यावर त्याला चॉकलेट कसं छान हे सांगण्यात अर्थ नाही. तसेच तुम्ही  स्वतर्‍च जर आइसक्रि म खात असाल तर मुलं चॉकलेट खाणार नाहीत.मुलांच्या निर्णयाकडे पाहताना पालक त्यांच्या पिढीच्या विचारसरणीतून पाहतात, पण मुलांना जग दाखवताना मुलांच्या पिढीची गरज मान्य करतात. या दोन्हीमध्ये असलेले अंतर लक्षात घेऊन पालकांनी  मुलांच्या निर्णयाबद्दल ठोकताळे मांडले तर मुलांचे वागणे समजून घेणे पालकांसाठी सहज होईल.(लेखिका समुपदेशक आहेत.)