शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

व्हॉट्सॲपवरचा डीपी आणि झाला काडीमोड

By मनीषा म्हात्रे | Updated: December 18, 2023 09:13 IST

एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या डिस्प्ले पिक्चरवर आपल्या जोडीदाराचा डीपी ठेवला नाही म्हणूनही वाद होत आहे. पोलिस अशा जोडप्यांचे चातुर्याने समुपदेशन करतात. 

- मनीषा म्हात्रे, वरिष्ठ प्रतिनिधीदोघेही उच्चशिक्षित. नवविवाहित. हसता खेळता संसार सुरू असतानाच, व्हॉट्सॲपला जोडीदाराचा फोटो डीपी म्हणून ठेवला नाही, म्हणून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. वाद पोलिस ठाण्यात पोहोचला. थेट दोघांनीही घटस्फोटाचा पर्याय निवडला; मात्र मुंबई पोलिसांमुळे त्यांचा संसार वाचला. त्यांच्यासारखी अनेक जोडपे क्षुल्लक वादातून थेट पोलिस ठाण्याची पायरी चढत आहेत. याच  दोघांमध्ये प्रेमाचा धागा बनून मुंबई पोलिस त्यांचे नाते पुन्हा फुलवताना दिसत आहेत. 

मुंबई पोलिसांच्या महिला अत्याचार विरोधी कक्षातील समुपदेशन कक्ष ही महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावत आहे. जानेवारीपासून समुपदेशन कक्षाला पती-पत्नीमधील वादांशी संबंधित ३८६ हून अधिक अर्ज प्राप्त झाले. त्यातील ५४ प्रकरणांमध्ये यशस्वीपणे मध्यस्थी करत दुरावलेले नाते पुन्हा एकत्र आणण्यास पथकाला यश आले. पीडित महिलांना न्याय देण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली दशकभरापूर्वी महिला अत्याचार विरोधी सेलची स्थापना केली होती. यामध्ये जवळपास ४२ महिला पोलिस उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. सध्याचा काळ बदलला आहे. पूर्वीच्या गंभीर कारणांपैकी, आजची वादाची कारणे वेगळी आहेत.

एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या डिस्प्ले पिक्चरवर आपल्या जोडीदाराचा डीपी ठेवला नाही म्हणूनही वाद होत आहे. पोलिस अशा जोडप्यांचे चातुर्याने समुपदेशन करतात. 

महिलांसंबंधित नोंदवलेल्या केसेस हाताळणे आणि त्यावर लक्ष ठेवण्याशिवाय, आम्ही आमच्या समुपदेशन केंद्रांद्वारे समुपदेशन करणे हे एक महत्त्वाचे काम करतो, असे या युनिटच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अपर्णा जोशी यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा, एखाद्या जोडप्यामध्ये वाद होतात आणि ते पती-पत्नी किंवा सासरच्या लोकांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यासाठी शहरातील ९६ पैकी कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये जातात, तेव्हा प्रथम स्थानिक पोलिस स्टेशनच्या स्तरावर त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना पुढील समुपदेशन करण्यास वाव आहे असे वाटत असल्यास, त्यांना क्रॉफर्ड मार्केट पोलिस मुख्यालयातील समुपदेशन केंद्रात किंवा लोअर परळमधील एन. एम. जोशी मार्ग स्टेशनजवळील केंद्रात पाठवले जाते. 

काही प्रकरणांमध्ये वंध्यत्वामुळे दोघांमध्ये भांडणे होत होती. आम्ही त्यांना आयव्हीएफ केंद्रांमध्ये मार्गदर्शन केले आणि आता त्यांना मुले आहेत आणि ते आनंदी आहेत. कोणतेही प्रशिक्षण नसतानाही, आमच्या पुरुष आणि महिला हवालदारांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे. आता इतर पोलिस युनिट्सनाही समुपदेशनाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अपर्णा जोशी यांनी नमूद केले.

टॅग्स :Divorceघटस्फोट