शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप ‘डीलिट फॉर एव्हरीवन’ : 7 मिनिटांच्या डीलिट खेळाची 5 कारणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:56 IST

आपण मेसेज डीलिट केल्याचं इतरांना कळतंच, आणि ते कळणंही गैरसमज निर्माण करूच शकतं.

ठळक मुद्देडीलिट चा पर्याय आहे म्हणून 7 मिनिटं स्टेकला लावू नका.

व्हॉट्सअ‍ॅपने डीलिट  फॉर एव्हरीवनचा पर्याय दिल्यानं जगभरात म्हणे आनंदोत्सव साजरा झाला. आपण एखाद्या व्यक्तीला अगर गटाला पाठवलेला मेसेज, फोटो, व्हिडीओ आत सात मिनिटांच्या आत डीलिट  करता येणार आहे. तो डीलिट  करण्याचा पर्याय आहे पण म्हणून आपण डीलिट केल्याचं कुणाला कळत नाही असं नाही. ते कळतंच. आणि ते कळणंही हे ही गैरसमजाला पुरेसं निमित्त देऊ शकतं. त्या गैरसमजातून भविष्यांत नात्यांत अधिक तणाव निर्माण होऊच शकतात. पण आज अनेकांना हा डीलिटचा पर्याय का महत्वाचा वाटतो. त्याची पाच कारणं आहेत. ती कारणं आपल्यालाही लागू पडतात का, तपासून पहा.

1) तुम्ही ऑफिसच्या ग्रूपवर काहीबाही लिहिलं. रागाच्या भरात. बॉसला सुनावलं. पण काही मिनिटातच लक्षात येतं की असं नको होतं लिहायला. ते पटकन डीलिट केलं तर बरं. मग अनेकजण तातडीनं लिहिलेलं डीलिट करतात. अर्थात म्हणून डॅमेज कण्ट्रोल होत नाही पण कुणी स्क्रिनशॉट घेतला नाही तर ते पुसलं तरी जातं.2) नात्यात, भांडणात असं अनेकदा होतं. आपण बोलून जातो.ताडताड बोलतो. समोरचा ऑफलाइन असेल तरी लिहित सुटतो. व्हॉट्सअ‍ॅपवर भांडतो. त्यावेळी हा मेसेज पुसण्याचा पर्याय बरा पडतो.3) जे लिहिलं, त्याचा कुणी स्क्रिनशॉट घेऊन ठेवेल अशी लिहिल्यावर भीती वाटली तर पुढच्याच मिन्टाला ते पुसताही येतं आता.

4) अलिकडचा एक भयंकर प्रकार म्हणजे प्रेमात असलेले अनेकजण परस्परांना काही न्यूड फोटो वगैरे टाकतात. पण अनेकदा ते टाकल्यावर पश्चाताप होतो. 7 मिनिटात आता तो पश्चाताप दुरुस्त करण्याची संधी आहे.

5) आपण चुकून, अगदीच नजरचुकीने एखाद्या ग्रूपवर, व्यक्तीला भलताच मेसेज पाठवला असं लक्षात आलं तर ओशाळं होण्यापेक्षा तो मेसेज वेळेच्या आत पुसलेला बरा.अर्थात या पुसापुशीसाठी हातात फक्त 7 मिनिटं आहेत, आणि त्यात चूक दुरुस्त नाही झाली तर गैरसमज अटळ आहेतच.