शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतरही बायको माहेरचंच आडनाव लावतेय? -याचा काय अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 16:15 IST

एक नवीन अभ्यास म्हणतोय की, लग्नानंतरही बायकोनं आडनाव बदललं नाही तर लोक त्या लग्नाकडे, नात्याकडे, त्यातल्या सत्ताविभाजनाकडे अजूनही जुनाट नजरांनीच पाहतात. पत्नी पतीला डॉमिनेट करते असं लोकांना वाटतं.

ठळक मुद्देआपण आधुनिक काळात राहत असलो तरी जगभरात आजही बायकोनं लग्नानंतर पडतं घेणंच समाजाला अभिप्रेत आहे का?

लग्न  होतं. लग्नानंतर बायकोनं नाव बदलायचं ही पिढय़ांपिढय़ाची रीत आहे. जगभर आहे. पण आजकाल अनेकजणी लग्नानंतर आडनाव बदलत नाही. किंवा माहेर-सासर दोन्ही आडनावं लावतात. आपल्या समाजात तर लग्नानंतर नाव न बदलणं हे अजूनही त्रासदायकच होतं. अनेक ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट घेऊन फिरावं लागतं. त्यातही कागदोपत्री नाव न बदलणं, नवर्‍याचं आणि मुलांचं आडनाव वेगळं असणं आणि बायकोचं आडनाव वेगळं असणं याचा समाजाला भयंकर त्रास होतो. हे वास्तव आपल्या समाजातलं आहेच पण जगात पुढारलेल्या म्हणवणार्‍या देशांतही हेच चित्र आहे. अमेरिकेतल्या नेवाडा विद्यापीठानं प्रसिद्ध केलेला अभ्यासच तसं सांगतोय. सेक्स रोल्स नावाच्या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशात केलेल्या अभ्यासातून काही निष्कर्ष त्यांनी जगासमोर ठेवले आहेत.पाश्चिमात्य देशातही लग्नानंतर महिलेने स्वेच्छेने पतीचे आडनाव लावणे ही समाजरीत आहे. बरीच जुनीही आहे. आजही ती रीत अनेकजणी पाळतात. पण गेल्या काही दशकांत महिलांना असा प्रश्न पडू लागला की लग्नानंतर आपलं नाव बदलायची गरज आणि सक्ती काय आहे? नाव न बदलण्याचं प्रमाण बरंच वाढलं. पण नाव बदलणार्‍या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आणि नाव न बदलणार्‍या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन यात मात्र फरक पडत गेला.या  नाव न बदलणार्‍या महिला अती महत्वाकांक्षी, स्वकेंद्री असतात अशी लेबलं समाजानं लावायला सुरुवात केली. त्या लग्नातही जास्त रुबाब करतात, नवर्‍यांना वरचढ असतात, डॉमिनेट करतात असं म्हणण्यार्पयत समाजाची मजल जाते. वैवाहिक नात्यात बायको वरचढ तर पती कमजोर ठरतात. बायकोनं कसं प्रेमळ, समजूतदार, नमतं घेणारी, फार रुबाब न करणारी असावं अशीच आजही समाजाची अपेक्षा आहे असं हा अभ्यास म्हणतो.काळ कितीही बदलला आणि समाज विकसीत झाला असं कितीही म्हटलं तरी स्त्रीपुरुष समानतेसंदर्भात अजून बरंच काम बाकी आहे याचं हे विदारक चित्र आहे.