शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

WATCH THIS VIDEO: आयआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला एड शीरनच्या गाण्याचा ‘भन्नाट’ व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 16:45 IST

​आयआयआयटी रुडकीच्या चार विद्यार्थ्यांनी एड शीरनच्या ‘शेप आॅफ यू’ या गाण्याचा ‘भन्नाट’ म्युझिक व्हिडिओ बनविला आहे. केवळ तीनच दिवसांत साडेसहा लाखांपेक्षा जास्त व्ह्युवज् आणि तीस हजारांच्या आसपास लाईक्स त्याला मिळालेले असून सोशल मीडियावर सर्वत्र तो शेअर केला जात आहे. तो पाहून तुमचा मूड नक्कीच चांगला होईल.

इंग्रजी संगीतप्रेमींना एड शीरनचे सुपरहिट गाणे ‘शेप आॅफ यू’ माहितच असेल. बऱ्याच जणांनी गाण्याचा म्युझिक व्हिडिओदेखील पाहिला असेल. तरुणांना प्रचंड वेड लावलेल्या या गाण्याने शीरनाला अफाट लोकप्रियता मिळवून दिली. गुगलवर जाऊन सर्च केले तर या गाण्याचे कित्येक वेगवेगळे व्हर्जन्स तुम्हाला सापडतील.याच गाण्याला आयआयआयटी रुडकीच्या चार विद्यार्थ्यांनी मजेशीर रुप दिले आहे. या विद्यार्थ्यांनी ‘शेप आॅफ यू’ या गाण्याचा बनवलेला म्युझिक व्हिडिओ ‘भन्नाट’च आहे. व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आगोदर आयआयआयटी रुडकीमध्ये शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या गाण्याचा त्यांच्या स्टाईलमध्ये व्हिडिओ अपलोड केला आणि बघतबघता तो तुफान व्हायरल झाला.या व्हिडिओमध्ये चार मुलं कॉलेजमधील एक मुलीला व्हॅलेंटाईन डेसाठी इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करत असतात. कोणी जादू करतो, कोणी गिटार वाजवतो, एक जण स्प्रे पोंटिंग करतो तर एक जण अ‍ॅथलिट आहे. आपापल्या प्रकारे ते या मुलीला इम्प्रेस करत राहतात. अखेर शेवटी ती मुलगी कोणाला हो म्हणते? त्यासाठी आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहा.                                            केवळ तीनच दिवसांत साडेसहा लाखांपेक्षा जास्त व्ह्युवज् आणि तीस हजारांच्या आसपास लाईक्स त्याला मिळालेले असून सोशल मीडियावर सर्वत्र तो शेअर केला जात आहे. एवढेच नाही तर भारतात ट्रेंडिंग पहिल्या १० यूट्यूटब व्हिडिओजमध्ये त्याचा समावेश झाला होता.अत्यंत उत्तम कोरिओग्राफी, सुंदर कॅमेरावर्क, उत्कृष्ट एटिडिंगमुळे हा व्हिडिओ तांत्रिकदृष्ट्याही एकदम चांगला झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे डान्सिंग स्कील खरोखरंच वाखाणण्याजोगे आहे. विशेष म्हणजे ही सगळी कामे विद्यार्थ्यांनीच केली आहेत. व्हिडिओ खाली पडणाऱ्या कमेंट्सवरून कळते की, नेटिझन्सना विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न अतिशय आवडत असून त्यांना ते अशाप्रकारचे आणखी व्हिडिओ अपलोड करण्याची विनंतीही करू लागले.प्रिया अजनिया, मीत सपारिआ, संभव जैन, सत्यब्रता पांडा, देवार्श तिवारी, अपुर्वा जतान या विद्यार्थ्यांनी मिळून हा व्हिडिओ तयार केलेला आहे, जो अनेकांच्या मते एड शीरनच्या मूळ व्हिडिओपेक्षा जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक आहे. ओरिजनल व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा आणि आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा.ओरिजनल व्हिडिओ: