द कपिल शर्मा शो मधील सुमोना सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 18:36 IST
चित्रपट, सिरीयल किंवा नाटकात साधी भोळी भूमिका साकारणारे कलाकार रियल लाइफमध्ये तसे असतीलच असे नाही
द कपिल शर्मा शो मधील सुमोना सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल
चित्रपट, सिरीयल किंवा नाटकात साधी भोळी भूमिका साकारणारे कलाकार रियल लाइफमध्ये तसे असतीलच असे नाही. कित्येक कलाकार फिल्मी जगतात खूपच साधी भोळी व्यक्तिरेखा साकारतात मात्र, रियल लाइफमध्ये वागतात वेगळेच.शासनाच्या नियमानूसार कॅमेºयासमोर किंवा चित्रपटाच्या दृष्यांमध्ये धुम्रपान करणे कायद्याने बंदी आहे, मात्र या नियमांचे उल्लंघन ‘द कपिल शर्मा शो’मध्ये साधी सरळ दिसणाºया सुमोनाने केले असून तिचा नववारी नेसून सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शूटींग दरम्यान ब्रेकमध्ये ती सेटबाहेर उभी राहून सिगारेट ओढताना या व्हिडिओत दिसते. नुकतीचं ‘सैराट’ चित्रपटाची संपूर्ण टीम ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर गेली होती. त्यावेळच्या भागात सुमोनाने हीच नववारी परिधान केलेली होती. त्याच दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहेत.