शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

त्या मोरपंखी दिवसांसाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:36 IST

आपल्या आजूबाजूची जळमटं दूर सारा आणि डोकवा थोडं बालपणात..

ठळक मुद्दे जगा की स्वत:साठी..जमवा मित्रांबरोबरच्या गप्पांच्या मैफली आणि अड्डे.काढा ती आपली जुनी विटीदांडू. मांडा तो पत्त्यांचा डाव पुन्हा एकदा.. उडू द्या आपले पतंग आकाशात..

- मयूर पठाडेआठवतंय तुम्हाला, यापूर्वी कधी तुम्ही तुमच्या स्वत:साठी, फक्त स्वत:साठी म्हणून एखादी गोष्ट केलीय?.. कसं आठवणार?.. कारण विसरुनच गेलोय आपण स्वत:साठी जगणं. कोणतीही गोष्ट आजवर आपण केलीय, ती कायम दुसºयासाठी. मग ती कधी कुटुंबासाठी असेल, कधी दुसºयांना चांगलं वाटावं म्हणून असेल, आपल्याशिवाय दुसरं कोणीच करणार नाही म्हणून असेल.. कितीतरी कारणं..पण.. माझ्या स्वत:साठी मी केलंय.. असं कधी आपल्या आयुष्यात दिसतच नाही.अगदी साध्या साध्या गोष्टी..लहानपणी तुम्हाला पतंग खेळायला खूप आवडायचं, गोट्या खेळतांना तर तुम्ही देहभान विसरून जायचात. लहानपणी गल्लीत छप्पापाणी, डब्बा गुल, आबाधोबी, लिंगोरचा.. कितीतरी खेळ.. पण अख्खा दिवस कसा मजेत जायचा.. मग कुठे गेली ही गंमत? कुठे गेले ते जवळचे सगळे मित्र?.. ज्यांच्याशिवाय आपल्याला एक क्षणही कधीच करमत नव्हतं?.. जीवाला जीव देत होतो आपण त्यांच्यासाठी.. मग आज काय झालंय?.. का संवाद त्यांच्याशी तुटलाय? विचार करा स्वत:शीच. खरंच आपण इतकी कामात असतो, खरंच आपल्याला इतका शिणवटा आलाय, की आपल्या जवळच्या मित्रमंडळींशी बोलायला.. भले नका प्रत्यक्ष भेटू, पण ज्यांच्यासोबत आयुष्याची सोनेरी स्वप्नं पाहिली, रंगवली त्या आपल्या सहकाºयांशी, मित्रांशी निदान सुरुवातीला फोनवर तर बोलता येईल की नाही?पहा एकदा बोलून. काढा त्या जुन्या खोल आठवणी. मनाच्या गाभाºयात खोल रुतून बसलेलं तुमचं तारुण्य पुन्हा फसफसून बाहेर येतं की नाही ते बघा..मनावर साचलेली सारी जळमटं झडून जाऊ द्या. करा आपल्या मनासारखं. आपल्याला जे आवडतं ते.. काढा ती आपली जुनी विटीदांडू. मांडा तो पत्त्यांचा डाव पुन्हा एकदा.. उडू द्या आपले पतंग आकाशात.. जमवा ती गॅँग पुन्हा एकदा.. आणि हसीमजाक करता करता दणाणून जाऊ द्या पुन्हा एकदा आसमंत..किमान दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतंय की नाही बघा..