- मयूर पठाडेमुलं कोणताही खेळ खेळत असो, पण लहानपणापासून ती खेळली पाहिजेत. घराबाहेर पडली पाहिजेत. त्यासाठी त्यांनी अगदी ग्राऊंडवर जाऊन आणि एखादा खेळ सिरिअसली शिकला पाहिजे आणि फॉलो केला पाहिजे असं नाही, पण अगदी गल्लीत का होईना, त्यांनी नियमितपणे आपल्या बरोबरच्या मुलांबरोबर, मित्रांबरोबर खेळलं पाहिजे. ज्या अनेक गोष्टी आपण मुलांना घरात शिकवू शकत नाही, कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी आपण त्यांच्या मनावर बिंबवू शकत नाही अशा अनेक गोष्टी मुलं मित्रांमध्ये शिकतात.शिक्षणतज्ञांचं तर म्हणणं आहे, आपलं मूल कोणत्या मुलांमध्ये खेळतं, कोणाबरोबर राहतं, त्या मुलांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दर्जा काय आहे, या खरं तर दुय्यम गोष्टी आहेत. तुमच्या घरात जर चांगले संस्कार असतील, मुलांशी जर तुम्ही ‘आदर्श’ पद्धतीनं वागत असाल आणि त्यांच्या समोर किंवा नकळत काही चुकीच्या गोष्टी तुम्ही करीत नसाल, तर अशा पालकांना घाबरण्याची काहीच गरज नाही. ‘वाईट’ मुलांच्या संगतीत आपली मुलं बिघडतील असा धोकाही त्यामुळे फारसा उद्भवत नाही. खरंतर कोणतंच मूल वाईट नसतं आणि प्रत्येकांत काही ना काही गुण असतातच.मुलांशी आपले संबंध मात्र खेळीमेळीचे असले पाहिजेत आणि त्यांच्यापासून पालकांनी काही लपवूनही ठेवायला नको. जितक्या लहान वयात मुलं घराबाहेर पडतील, तितक्या लकवर ते सोशल होतीलच, पण अनेक प्रकारच्या गोष्टी ते शिकतील, जे त्यांच्या भविष्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल.संशोधनानं सिद्ध झालं आहे की, जी मुलं लवकर घराबाहेर, मित्रमंडळींमध्ये मिसळतात, त्यांच्यात अनेक प्रकरची स्किल्स डेव्हलप होतात, त्यांची मोटर स्किल्सही इतरांपेक्षा अधिक समृद्ध झालेली असतात. त्यांचा मेंदूही लवकर विकसित होतो आणि त्याचा सुयोग्य प्रकारे वापर करायलाही ती पटकन शिकतात.त्यामुळे आपलं मूल कोणाबरोबर खेळतं यापेक्षाही ते बाहेर जाऊन खेळतं की नाही याकडे जास्त लक्ष द्या. अर्थातच मूल कुठलं चुकीचं पाऊल उचलत असेल, तर त्याकडेही आपलं लक्ष असायलाच हवं..
मुलं जितक्या लवकर परिसरात मिसळतील, तेवढ्या लवकर त्यांचा मेंदू होईल विकसित..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:06 IST
आपलं मूल कोणाशी खेळतंय, यापेक्षाही ते बाहेर जाऊन खेळतं की नाही याकडे द्या अधिक लक्ष..
मुलं जितक्या लवकर परिसरात मिसळतील, तेवढ्या लवकर त्यांचा मेंदू होईल विकसित..
ठळक मुद्देआपलं मूल कोणत्या मुलांमध्ये खेळतं, कोणाबरोबर राहतं, त्या मुलांचा दर्जा काय, या खरं तर दुय्यम गोष्टी आहेत.घरातले चांगले संस्कार आणि ‘आदर्श’ मुलांना नेहमीच चुकीच्या मार्गापासून दूर राखतात.मुलं जितक्या लवकर परिसरात मिसळतील, तितक्या लवकर ते अधिकाधिक गोष्टी शिकतील.