शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रीवाचा झाला रवींद्र जडेजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 17:16 IST

क्रिकेटर रवींद्र जडेजा आज रविवारी रीवा सोलंकी हिच्यासोबत लग्नगाठीत अडकला. 

क्रिकेटर रवींद्र जडेजा आज रविवारी रीवा सोलंकी हिच्यासोबत लग्नगाठीत अडकला. राजकोट येथील एका हॉटेलात हा अलिशान सोहळा पार पडला. तत्पूर्वी राजवाडी थाटात जडेजा फुलेकूवर(वरात) निघाला. फुलेकूनंतर कारमध्ये बसून जडेजा लग्न सोहळा होत असलेल्या हॉटेलात पोहोचला. घोडीवर बसण्यापूर्वी जडेजा सासºयाने भेट दिलेल्या आॅडी कारमधून घरातून निघाला. ही कार गुलाबांनी सजवली होती. गुजराती राजपूत लग्नात वधू पक्षाचे लोक वरास तलवार भेट देतात. याला तलवार विधी म्हणतात. यासोबतच घरातून वधूची विदाईही होते आणि लग्नानंतरच ती घरी परतू शकते. हाच विधी पूर्ण करण्यासाठी रीवाच्या घरूनही विदाई झाली होती.रवींद्र जडेजाच्या ग्रँड वेडिंगकडे सगळ्यांचेच लक्ष लागले असताना आम्ही या सोहळ्याचे काही खास छायाचित्रे आमच्या हाती लागली आहेत.   तेव्हा बघाच ही छायाचित्रे.रवींद्र जडेजाचे लग्न ‘वांद्यात’!क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याचा आज रविवारचा लग्नसोहळा चांगलाच वांद्यात सापडला. जडेजाची वरात वधूमंडपी पोहाचणार तोच, वरातीतील जडेजाच्या एका नातेवाईकाने आनंद साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार केला. ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. साहजिकच पोलिस घटनास्थळी आले व आनंदात काहीसे विरजन पडले. जडेजाच्या एका नातेवाईकाने हवेत गोळीबार केला. याचा व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुभकार्यांत हवेत गोळीबार करून आनंद साजरा करण्याची प्रथा असली तरी हे गैर आहे. बंदुकीचा परवाना असतानाही तिचा अशाप्रकारे वापर अवैध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. लोधिका पोलिस ठाण्याचे पीएसआय महेन्द्रसिंह राणा यांनी सांगितले की, आम्हाला आमच्या कंट्रोलरूम कडून माहिती मिळाली. आम्ही फुटेज तपासत आहोत. बंदुकीचा परवाना असला तरी ती केवळ स्वसुरक्षेच्या स्थितीतच वापरली जाऊ शकते. तिचा अवैध वापर झाल्याचे सिद्ध झाल्याच आरोपींना ३ वर्षे कारवासाची शिक्षा होऊ शकते.