शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

जुलैमध्ये येतो तुमचा वाढदिवस? जाणून घ्या स्वत:बद्दलच्या 'या' 7 खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 13:29 IST

व्यक्तीच्या जन्माचा महिना, वार आणि दिवस यावरून त्यांच व्यक्तीमत्त्व ओळखण्यास मदत होते. यामुळे त्यांच्या स्वभावाबातच्या काही खास गोष्टी समजण्यासही मदत होते.

व्यक्तीच्या जन्माचा महिना, वार आणि दिवस यावरून त्यांच व्यक्तीमत्त्व ओळखण्यास मदत होते. यामुळे त्यांच्या स्वभावाबातच्या काही खास गोष्टी समजण्यासही मदत होते. एवढचं नव्हे तर त्यांच्या आवडी-निवडीबाबतही जाणून घेणं सहज शक्य होतं. सध्या जुलै महिना सुरू आहे. जर तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस जुलै महिन्यामध्ये येत असेल तर, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबाबतच्या काही हटके गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कदाचित तुमच्यबाबतच्या या गोष्टी तुम्हालाही माहीत नसतील. जाणून घेऊया जुलै महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीमत्त्वाच्या काही हटके गोष्टी... 

1. समजुतदार असतात

वर्षाच्या 7व्या महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींना त्यांच्या समजुतदारपणासाठी ओळखलं जातं. असं मानलं जातं की, या केवळ आपल्या समजूतदार पणाच्या जोरावर अनेकांची मनं जिंकण्यात यशस्वी होतात. तसेच समोरच्या व्यक्तीच्या अडचणी समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना योग्य तो सल्लाही देतात. 

2. बुद्धिमान असतात

जुलैमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींबाबत असं सांगण्यात येतं की, या व्यक्ती बुद्धिमान असतात. शिक्षणामध्ये त्यांनी योग्य क्षेत्राची निवड केली तर त्या यशाचा फार मोठा पल्ला गाठतात. तसेत असंही सांगितलं जातं की, या व्यक्ती ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये जाता, त्या क्षेत्रात यशस्वी होतातच. 

3. इतरांना मदत करतात

जर यांच्याकडे कोणीही मदत मागितली तर या व्यक्ती नाही म्हणत नाहीत. कोणत्याही परिस्थितीमध्ये या इतरांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. या व्यक्तींबाबत असंही सांगितलं जातं की, एखाद्या व्यक्तीसोबत यांचे वाद झाले असतील तरिही त्यांच्या अडचणीच्या काळामद्ये त्यांना मदत करण्यासाठी या व्यक्ती धावून जातात. 

4. इतरांची काळजी घेतात घेतात 

आपलं कुटुंब, मित्रमंडळी आणि जवळच्या व्यक्तींना या व्यक्ती जीवापाड जपतात. जर तुम्ही यांच्यासोबत रस्त्यावरून चालताना होलत असाल तर त्यांचं लक्ष या गोष्टीवर जास्त असतं की, तुम्ही रस्त्यावरून व्यवस्थित चालत आहात की नाही. 

5. प्रत्येक छोट्या गोष्टींशी जोडलेल्या असतात

अनेकदा दिवसभरामध्ये आपण अनेक छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. परंतु जुलैमध्ये जन्मलेल्या व्यक्ती असं कधी करत नाहीत. असं म्हटलं जातं की,  या व्यक्तींच्या सर्व गोष्टी लक्षात असतात. कोणी काय बोललं, काय केलं यांसारख्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी या लक्षात ठेवतात. याचे अनेक फायदे आहेत आणि नुकसानही. 

6. कुटुंबावर फार प्रेम करतात 

जुलैमध्ये जन्मलेल्या व्यक्तींसाठी आपलं कुटुंबच सर्व काही असतं. असं म्हटलं जातं की,  कोणतीही गोष्ट असो आनंदाची किंवा दुःखाची, कोणतीही गोष्ट सागंण्यासाठी या व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यांकडेच जातात. 

7. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतात

जुलैमध्ये जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असतात. एखाद्या व्यक्तीशी बोलताना ते प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट लक्षात असते. त्यामुळे तुम्ही सहजासहजी यांच्याशी खोटं बोलू शकत नाही. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व