शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

मुलं सारखे हट्ट का करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 11:51 IST

पालक आपला वेळ न देता, वस्तू द्यायला लागले तर मुलं तेच मागणार!

ठळक मुद्देमुलांचे मित्र होणं अवघड असलं तरी एकमेकांशी खुलेपणानं बोला तरी!

-योगिता तोडकरअजिंक्यचे वडील माझ्याकडे आले, ते सांगत होते कॉलेजमध्ये गेल्यापासून अजिंक्यचं वागणं पार बदलून गेलय. तो रोज नवीन वस्तू मागत असतो. आता तर त्याच्या इतर मित्रांप्रमाणे एक भव्य फ्लॅट घेऊ म्हणून मागे लागलाय. त्यांना शक्य होतं, तर आपल्याला का नाही असे काहीतरी प्रश्न विचारून भंडावून सोडतो. आम्ही दोघे ऑफिसमधून घरी आलो की याची भुणभुण सुरुच. त्याला रोज या नाही त्या प्रकारे समजावतो पण विशेष काही बदलच नाही. कामाचा ताण त्यात  घरी येताच चिरंजीव असे मागण्या करतात.  वैतागून गेलोय अगदी. त्यानंतर अजिंक्यशी व त्याच्या वडिलांशी स्वतंत्न चर्चा केल्यावर काही ठळक गोष्टी निदर्शनास आल्या. अजिंक्यचे आई व वडील नोकरी करतात. त्यामुळे तो आजी आजोबांनाबरोबर वाढला. आठवड्यातून एकदा ते फिरायला, जेवायला जातात, एवढाच वेळ ते एकत्न घालवतात. मग अजिंक्यासारखी मुलं घराबाहेर जास्त वेळ घालवू पाहतात. त्यांना आकर्षित करतील अशा अनेक गोष्टी बाहेरच्या जगात असतात. जिथे ते रमतात. त्यांना नवीन अनुभव घ्यावेसे वाटतात. त्यात मग त्यांना नवीन मित्न मैत्रिणी भेटत असतात. घरी कोणी वेळ द्यायला नसल्याने या मंडळींबरोबर जास्त वेळ घालवायला सुरवात होते. जास्त वेळ एकत्न घालवल्याने मित्न मंडळींचे विचार आपलेसे वाटू लागतात. आणि  त्यानुसार निर्णय प्रक्रि या चालू होते. सुरवातीला आपल्याला वाटतं, व्हायचंच. हे असं वागणं बोलणं, वयच तसं असतं. हळू हळू मुलं सैरभैर व्हायला लागली कि मग आपण याचा गंभरतीने विचार करायला लागतो. आपल्या मुलांच्या वागण्यात, विचारप्रक्रियेत निर्णयप्रक्रियेत बदल होण्याची आपण वाट का पाहावी?मुळात आपल्या मुलांमध्ये व आपल्यामध्ये जवळीकतेचे संबंध हवेत.  त्यांच्यात व तुमच्यात सुसंवाद हवा. आपल्या घराची व त्यांना उपयोगी पडणारी मूल्य यांची ओळख तुम्ही त्यांना करून द्यायला हवी. आपण मुलांना किती व कसा वेळ देतो हे महत्वाचं म्हणूनच असतं.त्याचप्रमाणेआपल्या मुलांच्या मित्न मैत्रिणींची ओळख करून घ्यावी. त्यांना आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवावेत. या गोष्टींमुळे आपली मुलं कोणामध्ये वावरतात त्यामुळे आपल्या मुलांमध्ये काय बदल घडू शकतील, त्याला आपण कशी दिशा देऊ शकू हे लक्षात येते. मुलांना मित्न निवडायचं स्वातंत्र्य नक्की द्या, त्या निवडी स्वीकारा, त्याचा आदरदेखील करा. त्याबरोबरीने मित्न कसे निवडावेत त्यांच्याबरोबर नाते संबंध कसे ठेवावेत हेही समजावून सांगा. नात्याबरोबर भरकटणे आणि ते जपणे यातला फरक समजावून सांगा. म्हणजे कोणतेही निर्णय घेताना मित्न मैत्रिणीच्या प्रभावापेक्षा त्याच्या स्वतर्‍च्या विचारांचा प्रभाव जास्त असेल .    या वयात तुम्ही खरोखर मुलांचे मित्नमैत्रिणी बना, म्हणजे एक मित्न त्याच्यासाठी जे करतो ते सगळं करा त्यामुळे  मुलांच्या विचारांना, निर्णयांना व वर्तनाला योग्य दिशा मिळू शकेल.( लेखिका समुपदेशक आहेत.)