शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

रिहानाच्या गाण्याला हेम्सवर्थचा ‘टच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 20:48 IST

रिहानाच्या ‘वर्क’ या सुपरहीट गाण्याच्या ओळींना  क्रिस हेम्सवर्थने त्याच्या भारदस्त आवाजात वाचून दाखवले.

आपण सर्वजण ज्याला ‘थॉर’ म्हणून ओळखतो त्या क्रिस हेम्सवर्थने सर्वांना त्याचे काव्यवाचनाचे कौशल्य दाखवून आनंदाचा सुखद धक्का दिला आहे. इंग्लिश गायिका रिहानाच्या ‘वर्क’ या सुपरहीट गाण्याच्या ओळींना त्याने त्याच्या भारदस्त आवाजात वाचून दाखवले.आगामी ‘द हंट्समन : विंटर्स वॉर’ या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी तो ‘बीबीसी रेडियो 1’ येथे निक ग्रिमशॉच्या ‘द रेडियो 1 ब्रेकफास्ट शो’मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने रिहानाच्या गाण्याचे जणू काही कविता वाचतोय अशा प्रकारे भावपूर्ण वाचन केले.‘वाचत असताना माझ्या भावना आणि भूतकाळातील अनुभव डोळ्यासमोर तरंगले. आताच्या आता उठून कामाला जाण्याची प्रेरणा मला मिळाली. बघा मुलांनो! तुम्हीसुद्धा पटकन कामाला लागा ’, असे क्रिस गंमतीने म्हणाला. येत्या 22 एप्रिल रोजी ‘द हंट्समन : विंटर्स वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित होत असून क्रिस यामध्ये ‘स्नो व्हाईट अँड द हंट्समन’ चित्रपटातीलच भूमिका पुन्हा साकारतोय. त्याच्यासह चार्लिज् थेरॉन ‘क्वीन रवेना’ म्हणून तर एमिली ब्लंट आईस क्वीन ‘फ्रेया’ आणि जेसिका चॅस्टेन ‘सेराह’च्या भूमिके त दिसणार आहे.मग रिहाना तुला कसे वाटले?

via GIPHY