शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला एकच मूल आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:46 IST

ते ‘सोशल’ होण्यासाठी घ्यावे लागतील जास्त कष्ट

ठळक मुद्देएकच मूल असण्याचे फायदे आहेत तसंच काही अडचणीही आहेत.ज्या कुटुंबात एकच मूल आहे, अशी मुलं कमी सोशल असू शकतात.त्यासाठी पालकांनी जास्त काळजी घेणं आवश्यक.

- मयूर पठाडेतुम्हाला किती मुलं आहेत? खरंतर आता हा प्रश्न विचारणचं चुकीचं आहे. आजकाल अनेक तरुण पालकांना एक किंवा फारतर दोन मुलं असतात. काही जण ठरवून उशिरा मूल होऊ देण्याचं ठरवतात किंवा एकाच मुलावर समाधान मानतात. अर्थात त्यामागची कारणंही वास्तव आहेत.एकच मूल होऊ देण्याचे फायदे आहेत तसंच काही अडचणीही आहेत. एकच मूल असण्याची सगळ्यांत मोठी अडचण म्हणजे या मुलाला ‘सोशल’ कसं बनवायचं, हा अनेक पालकांना प्रश्न असतो. कारण घरात एकापेक्षा जास्त मुलं असल्यावर त्यांच्या ‘सोशल’ होण्याचा मार्ग बºयापैकी सुलभ होतो. पण ठरवून एकल मुलाचं पालकत्व स्वीकारणाºया पालकांसाठी जमेच्या बाजूूही बºयाच आहेत. एकाच मुलावर त्यांना लक्ष केंद्रित करता येत. त्याच्या आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीचा झगडा आणि संघर्षही तुलनेनं मर्यादित होतो. मुलांच्या वाढीतील आणि त्यातही आजकाल अत्यंत महाग झालेल्या शिक्षणाचा खर्च पेलणं त्यातल्या त्यात सोयीचं होतं.. मुलांचं आणि त्यातही पालकांचं स्वत:चं करिअर.. या गोष्टीही असतातच. त्यासाठीही एकच मूल असणं अनेक तरुण पालक पसंत करतात. एक मूल असण्याचे फायदे, सोयी बºयापैकी जास्त असले तरी या आपल्या मुलांना सोशल कसं बनवायचं याच मुख्य प्रश्नापुढे बºयाच पालकांचं घोडं अडतं. अर्थात अनेक जण त्यातून पर्यायही काढतात, पण तो बºयाचदा तकलादू स्वरुपाचाच ठरतो. दोन्ही पालक जर नोकरी करणारे असतील तर त्यावेळी थोडी जास्तच अडचण येते. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातूनही हीच बाब समोर आली आहे. आपल्या मुलांना सोशल बनविण्यासाठी अनेक पालक प्रामाणिक प्रयत्न करतात, पण त्यांची ही धडपड बºयाचदा कमी पडते किंवा अशा पालकांची, म्हणजेच एकच मूूल असणाºयांची मुलं कमी सोशल असतात, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.एकाच मुलावर थांबणं हा निर्णय त्या त्या पालकांसाठी योग्यच आहे, पण आपल्या मुलांना सोशल बनविण्यासाठी त्यांना अधिक प्रयत्न करावे लागतील, याकडेही या अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे.