शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

लग्न आॅनलाइन ठरवलं पण खात्रीचं काय?

By admin | Updated: April 4, 2017 15:54 IST

मॉर्डन स्वरूपाचे विवाह प्रस्ताव ही आता आपली लाइफ स्टाइल झाली आहे. पण म्हणून आॅनलाइन जोडीदार निवडून बिनधास्त लग्न करावं असं नाही. लग्नातले पाहण्या निरखण्याचे नियम इथेही आहेतच, पण थोडे वेगळे !

मॉर्डन स्वरूपाचे विवाह प्रस्ताव ही आता आपली लाइफ स्टाइल झाली आहे. पण म्हणून आॅनलाइन जोडीदार निवडून बिनधास्त लग्न करावं असं नाही. लग्नातले पाहण्या निरखण्याचे नियम इथेही आहेतच, पण थोडे वेगळे !

- आधुनिक प्रकारचे विवाह प्रस्ताव हे आजच्या बदलत्या जीवनशैलीचा एक परिणाम आहे हे खरं. बदलत्या जीवनशैलीबरोबर आपल्या लग्नपद्धतीही बदलल्या. तद्वत फेसबुकसारख्या समाजमाध्यमावर ओळख होऊन जुळलेले लग्न हा एक नवीन प्रकार आपल्या जीवनात रूढ होऊ पाहतोय. फेसबुक, इन्स्ट्राग्राम, व्हॉट्सअ‍ॅप यासारखी समाजमाध्यमं ही दैनंदिन जीवनातील नित्याची बाब झाली आहे. समाजमाध्यमं हाताळताना ओळख नसलेल्या नव-नवीन लोकांच्या संपर्कात येणं अपरिहार्य झालं आहे. आॅनलाइन ओळखीवरून ठरवलेल्या लग्नाला प्रतिष्ठा आणि स्टेटस मिळत आहे. पण यामुळे नात्यांमध्येही काही प्रश्न आणि तणाव निर्माण होत आहे. जितक्य जबाबदारीनं मुलं मुली स्वत:चा आॅनलाइन जोडीदार निवडतात तितक्याच जबाबदारीनं एकमेकांची खात्री करून ती आपल्या आई बाबांनाही वाटेल यासाठीचे मार्ग मुला मुलींनी जबाबदारीनं शोधायला हवेत. आणि आपली ही आॅनलाइन पसंती आपल्या आई बाबांना पटवून देताना मुल मुली आपण निवडलेल्या जोडीदाराला परत एकदा पारखू शकता. आपल्यासाठी तो /ती जोडीदार म्हणून योग्य आहे ना याची खात्री आई बाबांना देता देता ती स्वत:लाही नव्यानं होवू शकते. आॅनलाइन लग्न ठरवताना मुला मुलींनी हा विषय नीट समजून घेऊन काही नियम पाळायला हवेत. आॅनलाइन लग्न ठरवताना..*आॅनलाइन लग्न ठरवताना आपण निवडलेल्या जोडीदाराचे कोणते गुण पाहिलेत. त्याच्यातले दोष कोणते याबाबत आई बाबांना माहिती द्यावी. * आपण जोडीदार निवडून लग्न करण्याचा जो निर्णय घेतला या दरम्यानची स्वत:ची विचारप्रक्रिया काय होती, कोणत्या प्रोसेसमधून आपल्या तो /ती जोडीदार म्हणून आवडला किंव आवडली हे आई बाबांना नीट समजावून सांगावं. * एकमेकांबद्दल कोणती माहिती, कशी आणि कुठून मिळवली याबाबत आई बाबांना सविस्तर सांगावं. * मुला मुलींनी आई बाबांना आपल्या फेसबुक पेजवर आणि अकाऊंटवर नेवून आपण परस्परांना शेअर केलेली माहिती वाचावयास द्यावी. दोन्हीकडचे कॉमन फ्रेंडस बघून त्यातील आई बाबांना हवे असलेल्यांचे नंबर द्यावेत. आई बाबांनी अशा कॉमन फ्रेंडसना फोन करून निवडलेल्या मुला/मुलीविषयी काही माहिती घ्यायची असेल तर चिडचिड न करता. त्याला विरोध न करता आई बाबांना ते करू द्यावं. आई बाबा ते का करता आहेत हे हवं तर त्यांच्याशी शांतपणे बोलून समजून घ्यावं. * आई बाबांना जर मुलांनी निवडलेल्या जोडीदाराच्या घरी जावून त्याची पाशर््वभूमी समजून घ्यायची असेल तर त्यांना ते अवश्य करू द्यावं. उलट स्वत: पुढाकार घेवून मुला मुलींनी परस्परांच्या आई वडिलांना एकमेकांच्या घरी बोलायला आमंत्रित करायला हवं. * आई बाबांना प्रत्यक्ष भेटीत आपण निवडलेला जोडीदार कसा वाटला याबाबतची त्यांची मतं त्यांच्याशी शांतपणे बोलून समजून घ्यावीत. काही विरोधी मतं असतील तर ती तशी का? हे थोडा वेळ घेवून स्वत:ही ती तपासून पहावीत. आपल्याला मिळालेली माहिती आणि आई बाबांना मिळालेली माहिती यात काही फरक आहे का? कोणता? का? याबाबतही मुलांनी थोडी जागरूकता दाखवून खात्री करून घ्यावी.* आपण निवडलेल्या जोडीदाराबद्दल जर आई बाबांची लवकर खात्री पटत नसेल तर मुलांनी थोडा धीर धरावा. आई बाबांना त्यांचा वेळ घेवू द्यावा. त्यांना त्यांचा निर्णय देण्यासाठी घाई करू नये. * आॅनलाइन निवडलेल्या जोडीदाराशी प्रत्यक्ष लग्न ठरल्यानंतर जर आई बाबांना किंवा स्वत: मुला मुलींना काही शंका आल्यास थोडं थांबून घेवून मनातली शंका आधी दूर करावी. * लग्न ही जबाबदारीनंच ठरवण्याची गोष्ट आहे, भेट कुठं झाली यापेक्षा अनुरुपता तपासून पाहणं जास्त महत्वाचं आहे.