शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुदैवाने अनर्थ टळला - मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला भोस्ते घाटात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 14:05 IST

आपल्या कुटुंबासह गावाकडे जाण्यासाठी निघालेली ही बस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास  खेड तालुक्याच्या हद्दीतील भोस्ते घाट उतरत होती. एका अवघड वळणार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या दुभाजकावर  आदळून पलटी झाली.

ठळक मुद्दे- रत्नागिरीहून निघाली होती बस

खेड : रत्नागिरी येथून मजुरांना घेऊन नेपाळ हद्दीवर निघालेल्या खासगी आरामबसला खेड नजीकच्या भोस्ते घाटात अपघात झाला. एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करणा-या नेपाळी मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी एक खासगी बस भाड्याने ठरवली होती. प्रत्येक मजुराकडून ७ हजार रुपये भाडे घेऊन खासगी बस या मजुरांना नेपाळच्या हद्दीवर नेऊन सोडणार होती. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी येथून सुटलेल्या या बसमध्ये ४० प्रवासी आणि काही लहान मुले होती.आपल्या कुटुंबासह गावाकडे जाण्यासाठी निघालेली ही बस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास  खेड तालुक्याच्या हद्दीतील भोस्ते घाट उतरत होती. एका अवघड वळणार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या दुभाजकावर  आदळून पलटी झाली. बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्वजण जीवघेण्या अपघातातून बचावले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

 

टॅग्स :AccidentअपघातBus DriverबसचालकRatnagiriरत्नागिरी