शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिष्ठी पुलाखाली अडकलेल्या तरुणाला एनडीआरएफ'ने वाचवले, अद्याप ओळख पटली नाही

By संदीप बांद्रे | Updated: July 20, 2023 15:22 IST

बघ्यांची पुलावर मोठी गर्दी

चिपळूण : शहरासह तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने वाशिष्ठी नदीला पुर आला होता. नदीचे पाणी वेगाने वाहत होते. अशातच नदीतून वाहत आलेला एक तरूण वाशिष्ठी पुलाच्या पिलरला लटकलेला होता. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. लाईफ जॅकेट आणि रोपवेच्या साहाय्याने एनडीआऱएफचे जवान त्या तरूणाजवळ पोहोचले. १६ जवानांच्या टिमने त्या तरूणास पुरातून सुखरूप बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला आहे.चिपळूणात बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. सातत्याने पावसाचा जोर राहिल्याने येथील वाशिष्ठी आणि शिवनदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वाशिष्ठीने धोका पातळी ओलांडल्याने प्रशासनाने सतर्कतचे इशारा दिला होता. दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास वाशिष्ठी नदीच्या पुलाखाली एका पिलवर तरूण अकडला असल्याची माहिती एनडीआरएफला देण्यात आली. त्याचवेळी एनडीआरएफची टीम शहरात कार्यरत होती. एनडीआरएफच्या पथकाचे निरीक्षक अशोक कुमार व त्यांच्या १६ जवानांची टीम तत्काळ आवश्यक साहित्यासह वाशिष्ठी पुलावर पोहोचली. यावेळी नदीची पाणी पातळी वाढतच होती. तसेच पाण्याला गतीही जास्त होती. एनडीआऱएफचे जवानांनी लाईफ जॅकेट, बोये तसेच रोपांच्या साहाय्याने त्या पिलरजवळ पोहोचले. त्यावेळी हा तरूण खूप घाबरलेल्या अवस्थेत होता. तेथे जवान येताच त्याला थोडा दिलासा मिळाला. जवानांनी त्या तरूणास सुखरूपणे बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. हे जवान वेळीत तेथे पोहोचल्याने तरूणाचा जीव वाचल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात पुलावर गर्दी केली होती. चिपळूण पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले होते. बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर शहर व परिसरातील लोकांना दिलासा मिळाला होता.

'तो' तरुण बोलतच नाहीएनडीआरएफच्या पथकाने वाशिष्ठीच्या पुलाखाली अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढल्यानंतरही तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला तात्काळ कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आता तो शुद्धीवर आला आहे. परंतु तो काहीच बोलत नाही. त्यामुळे त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.अशिद नरवणे यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणfloodपूर