चिपळूण : आजकाल नोकरीसाठी स्पर्धा आहे. बेकारी वाढली आहे. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या व्यवसायात अधिक लक्ष केंद्रीत करावे, त्यातूनही चांगले अर्थार्जन होते, तर तरुणींनी नोकरीवालाच जोडीदार हवा, हा अट्टाहास आता सोडायला हवा. सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजाची उन्नती साधावी, असे आवाहन महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ बोरसे यांनी केले. लांजा येथील श्री गणेश मंगल कार्यालयात संत गाडगेबाबा परीट समाज संस्थेचा पाचवा जिल्हा मेळावा व विद्यार्थी गुणगौरव समांरभ सोमवारी झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम ऊर्फ आबा महाडिक हे होते. कार्यक्रमासाठी अखिल गोमंतक मराठा समाज, गोवाचे अध्यक्ष विष्णू बांदेकर, उपाध्यक्ष आनंद खांडेपारकर, महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचे प्रदेश युवा अध्यक्ष संतोष भालेकर, चिपळूणच्या नगराध्यक्ष सावित्री होमकळस, पंचायत समिती सदस्य स्नेहा मेस्त्री, प्रा. विनायक होमकळस, एकात्मिक बालविकास प्रकल्प निवड समिती, चिपळूणचे तालुकाध्यक्ष कविता कदम, उद्योगपती राजीव कदम, माजी सरपंच सुनील मेस्त्री, परीट समाज सेवा संघाचे मधुकर कदम, तहसीलदार दशरथ चौधरी, युवा अध्यक्ष रितेश महाडिक, संस्थेचे उपाध्यक्ष हसमुख पांगारकर, सल्लागार दशरथ पावसकर, सुहास घाग, संघटक पांडुरंग सातारकर, दीपश्री कदम उपस्थित होते. संस्थेचे जिल्हा सचिव दीपक कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर विविध क्षेत्रात सन्मानाची पदे प्राप्त केलेल्या व्यक्तींचा व गणेश मूत्र्कििारांचा सत्कार करण्यात आला. पेठमाप येथील मिलिंद कदम यांनी संस्थेला संत गाडगेबाबांचा पुतळा भेट दिला. समाजाचा एस. सी.मध्ये समावेश व्हावा, यासाठी सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्याला सहकार्य म्हणून ११ हजार रुपयांचा धनादेश प्रदेशाध्यक्ष बोरसे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष महाडिक यांनी नुकताच सुपूर्द केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष कदम व सहसचिव जगदीश कदम यांनी केले. उपाध्यक्ष सुभाष कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिपळूण - गुहागरचे अध्यक्ष चंद्रकांत पाटेकर, दापोली - मंडणगडचे अध्यक्ष सुयोग घाग, खेडचे अध्यक्ष संतोष भोसले, संगमेश्वरचे अध्यक्ष रमेश धामणकर, लांजा - राजापूरचे अध्यक्ष किसन चाळके यांच्यासह अन्य समाजबांधवांनी सहकार्य केले. भावी काळात परीट समाजाने राज्यभर दौरे करून जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्कारमूर्तींनी आपल्या भावना यावेळी व्यक्त करून सहकार्याची ग्वाही दिली. (प्रतिनिधी)
तरुणांनी नोकरीच्या मागे लागू नये : एकनाथ बोरस
By admin | Updated: October 9, 2014 23:08 IST