शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गडनदी पात्रात तरुण बुडून बेपत्ता, शोध सुरु

By अरुण आडिवरेकर | Updated: December 3, 2024 17:29 IST

देवरुख : नदीपात्रात गेलेला प्लास्टिकचा टब काढण्यासाठी गेलेला तरुण बुडून बेपत्ता झाल्याची घटना काल, साेमवारी संगमेश्वर तालुक्यातील आरवली - ...

देवरुख : नदीपात्रात गेलेला प्लास्टिकचा टब काढण्यासाठी गेलेला तरुण बुडून बेपत्ता झाल्याची घटना काल, साेमवारी संगमेश्वर तालुक्यातील आरवली - गुरववाडी येथील गडनदी पात्रात घडली. प्रशांत प्रभाकर भागवत (वय २१, रा. रांबाडे चाळ, खेरशेत, ता. चिपळूण) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, अद्यापही त्याचा शाेध लागलेला नाही.प्रशांत भागवत याची काकी प्रतीक्षा प्रदीप यादव या साेमवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान गडनदी पात्रात कपडे धुवण्यासाठी गेल्या हाेत्या. त्यांच्यासाेबत प्रशांतही आंघाेळीसाठी गेला हाेता. दरम्यान, कपडे ठेवण्यासाठी नेलेला प्लास्टिकचा टब नदीपात्रातील पाण्यातून वाहून गेला. ताे पकडण्यासाठी प्रशांत याने नदीपात्राच्या पाण्यात उडी मारली. मात्र, त्यानंतर ताे पुन्हा बाहेर आलाच नाही.ही घटना घडल्यापासून नदीपात्रात बेपत्ता झालेल्या प्रशांत याचा शोध घेण्यात आला. परंतु, नदीपात्रातील पाण्याची पातळी जास्त व डोह तसेच खडक असल्याने शाेधकार्यात अडचण निर्माण हाेत आहे. माखजन तसेच संगमेश्वर पोलिस, आरवली गावचे सरपंच, स्थानिक ग्रामस्थ व प्रशांत याचे नातेवाईक त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.या घटनेची माहिती प्रशांत याचे वडील प्रभाकर बाळकृष्ण भागवत यांनी माखजन पोलिस स्थानकात दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी तपास करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdrowningपाण्यात बुडणे