शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

बोगस कामावरुन नगरसेवकांत ‘तू तू...’

By admin | Updated: July 13, 2015 00:40 IST

चिपळूण पालिका : गटाराच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे

चिपळूण : शहरातील नगर परिषदेतील एका सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकामध्ये गटाराच्या कामावरुन तू तू मैं मैं... सुरु झाले आहे. सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने गटाराच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे विरोधी गटातील गटनेत्याने फोनवरुन धमकीवजा जाब विचारल्याने पुन्हा एकदा गटार कामाच्या विषयाची चर्चा रंगू लागली आहे. शहरातील बेंदरकरआळी येथील नवा कालभैरव मंदिर ते प्रमोद पवार घरापर्यंत अंदाजे १५० मीटर गटाराचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. हे काम बोगस झाल्याची तक्रार सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने मुख्याधिकारी प्रकाश पाटील व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्याकडे केली होती. असे असतानाही संबंधित ठेकेदाराला कामाचे बिलही देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे काम शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने केले आहे. या तक्रारीमुळे विरोधी गटातील नगरसेवकाला याचा राग आला व शनिवारी सत्ताधारी गटातील त्या नगरसेवकास गटनेत्याने फोन केला. ‘तू गटाराच्या कामाची तक्रार का केलीस?’ असा जाब विचारला. मात्र, काम चांगले झाले आहे की नाही, हे अभियंता ठरवेल, असे उत्तर संबंधित नगरसेवकाने दिले. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ‘तू जर नगर परिषदेच्या विरोधात जात असशील तर आम्ही बघून घेऊ’, असा इशारा विरोधी गटाच्या नगरसेवकाने दिला आहे. दरम्यान, मोबाईलवरील हे संभाषण तक्रारदार नगरसेवकाने रेकॉर्ड केले असून, ते व्हॉट्सअपवर टाकले आहे. याची जोरदार चर्चा परिसरात सुरु आहे. गेल्या महिन्यात खेंड -बावशेवाडी येथेही गटाराचे काम निकृष्ट झाल्याचे उघड झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांचे गटार अथवा विकासकामांवर किती लक्ष आहे, हे या घटनांवरुन पुढे आले आहे.शहर परिसरातील कामे अंदाजपत्रकाप्रमाणे होत आहेत की नाही, यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवल्यास बोगस कामे होणार नाहीत, यासाठी सत्ताधारी व प्रशासन यांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)सत्ताधारी-विरोधकांत जुगलबंदी