शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आधार अपडेटसाठी तासनतास थांबावे लागते रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 13:20 IST

adhar Ratnagiri-काही वर्षांपासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, सर्वच बाबींसाठी गरज लागत आहे. त्यामुळे आता अगदी नवजात बालकाचेही आधार कार्ड काढावे लागत आहे. त्यातच फोटो, नाव, पत्ता यात सातत्याने बदल करावा लागतो. तसेच पाच वर्षांनंतर पुन्हा आधार कार्ड अपडेट करावे लागत असल्याने आधार केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. परंतु आधार केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिकांना तासन‌्तास रांगेत अगदी लहान मुलांना घेऊन रखडावे लागत आहे.

ठळक मुद्देआधार अपडेटसाठी तासनतास थांबावे लागते रांगेतजिल्ह्यात आधार केंद्रांची संख्या अपुरी असल्याने जनतेचे हाल

शोभना कांबळेरत्नागिरी : काही वर्षांपासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, सर्वच बाबींसाठी गरज लागत आहे. त्यामुळे आता अगदी नवजात बालकाचेही आधार कार्ड काढावे लागत आहे. त्यातच फोटो, नाव, पत्ता यात सातत्याने बदल करावा लागतो. तसेच पाच वर्षांनंतर पुन्हा आधार कार्ड अपडेट करावे लागत असल्याने आधार केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. परंतु आधार केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिकांना तासन‌्तास रांगेत अगदी लहान मुलांना घेऊन रखडावे लागत आहे.सुरुवातीला जेमतेम चार लाखांपर्यंत आधार कार्डचे काम झाले होते. त्यानंतर दुसरी एजन्सी नियुक्त करून आधार कार्ड बहुतांशी लोकांना देण्यात आले. मात्र, त्यानंतरही त्यात सातत्याने नाव, पत्ता बदलणे तसेच बालकांचे नवे आधार कार्ड काढणे यासाठी आधारकेंद्रांची गरज भासते. मात्र, जिल्ह्याच्या सुमारे १८ लाख लोकांसाठी केवळ ९५ आधारकेंद्रे सध्या सुरू आहेत. बंद असलेली केंद्रे सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.का करावे लागते आधार नुतनीकरणशालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, विविध शासकीय लाभ, बँकांचे व्यवहार, रास्त धान्याच्या लाभासाठी आदी सर्व कारणांसाठी आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. पाच वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करावे लागते तसेच आधार कार्डवरील फोटो, नाव, पत्ता बदल करण्यासाठी जुने आधार कार्ड अपडेट करावे लागते.

शहरात किंवा ठरावीक ठिकाणीच आधारकेंद्रांची सुविधा उभारलेली आहे. त्यामुळे आम्हाला शहरात यावे लागते. तहसील कार्यालयात एकच आधारकेंद्र असल्याने आम्हाला आधारकार्डमध्ये बदल करावयाचा झाल्यास नाइलाजाने थांबून रहावे लागते.- अनामिका सावंत,गावडेआंबेरे

सरकारने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. मात्र, आधारकेंद्राची संख्या कमी असल्याने बराच वेळ रांगेत रहावे लागते. लहान मुलांचेही आधारकार्ड काढावे लागत असल्याने त्यासाठी बराच वेळ लागतो. आधारकेंद्रांची संख्या वाढवायला हवी.- संकेत हरमल, कोळंबे

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डRatnagiriरत्नागिरी