शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 21:04 IST

कसलेही पुरावे विनायक राऊतांनी सादर केले नाहीत. फक्त माझ्यावर नेहमीप्रमाणे टीका केली.

नाणार प्रकरणावर आता शिवसेना खासदार विनायक राऊत आणि निलेश राणे आमने-सामने आले आहेत. निलेश राणेंनी काल पत्रकार परिषद घेऊन नाणार प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मावस भाऊ निशांत देशमुख आणि त्यांच्या कंपनीचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप केला होता. त्याला शिवसेनेचे खासदार  विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. माजी खासदार नीलेश राणे कधीही अभ्यास करून बोलत नाहीत आणि ते शुद्धीत बोलत नाहीत, असं विनायक राऊत म्हणाले होते. त्यावर निलेश राणेंनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे. निलेश राणे म्हणतात, नाणार रिफायरनरीसंदर्भात काल मी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं, त्यांचे घोटाळे, त्यांचे भ्रष्टाचार, सर्व्हे नंबर, गट नंबर हे सर्व पुराव्यांनिशी पत्रकारांसमोर सादर केले होते. त्यांच्यात मुख्यमंत्र्यांचा मावस भाऊ निशांत देशमुख, त्याची कंपनी अन् व्यवहार पुराव्यांनिशी पत्रकारांसमोर ठेवले होते. ते आज विनायक राऊतांना दुखलं. शिवसेनेच्या पोटात दुखायला लागलं. कसलेही पुरावे विनायक राऊतांनी सादर केले नाहीत. फक्त माझ्यावर नेहमीप्रमाणे टीका केली. मी जे पुरावे म्हणून कागदपत्र सादर केले, ते वाचावे लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल. पण विनायक राऊतांकडून त्याची अपेक्षा ठेवू नका, कारण ते १०वी नापास आहेत.१०वी नापास माणूस हे सर्व करू शकेल हे शक्य नाही. मला दोनच प्रश्न विचारायचे आहेत. निशांत देशमुख हा उद्धव ठाकरेंच्या मावशीचा मुलगा लागतो की नाही? आणि सुगी कंपनीचा तो संचालक आहे निशांत देशमुख, सुगी कंपनीनं नाणारमध्ये व्यवहार केले की नाही, एवढंच मला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगावं, असंही निलेश राणे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Vinayak Rautविनायक राऊत