शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मत्स्यपालन दिन : शोभीवंत माशांची कोट्यवधींची उड्डाणे, रंगीबेरंगी मासे फुलवतात सौंदर्य

By अरुण आडिवरेकर | Updated: November 22, 2022 12:32 IST

मासे पाळणे हा छंद गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. मासा शांत आणि आवाज न करणारा प्राणी असल्याने ताे पाळण्याकडे अनेकांचा कल असताे. त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे ‘फिशटँक’ किंवा बाउल उपलब्ध करून देणारी दालने तयार हाेऊ लागली आहेत. 

अरुण आडिवरेकर -

रत्नागिरी : काेणी घराची शाेभा वाढविण्यासाठी तर काेणी हाैस म्हणून घराघरात शाेभीवंत मासे पाळले जात आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत शहरी बाजारपेठेत रंगीबेरंगी माशांसाठी वेगळी बाजारपेठ तयार झाली आहे. या बाजारपेठेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात वर्षाला काेट्यवधींची उलाढाल हाेत आहे. त्यातून तरुणांच्या हाताला काम मिळू लागले आहे.मासे पाळणे हा छंद गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. मासा शांत आणि आवाज न करणारा प्राणी असल्याने ताे पाळण्याकडे अनेकांचा कल असताे. त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे ‘फिशटँक’ किंवा बाउल उपलब्ध करून देणारी दालने तयार हाेऊ लागली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास २५ ॲक्वेरियमची दुकाने आहेत. या दुकानांमधून दिवसाला तीन ते चार हजार रुपयांची विक्री हाेते. या माशांच्या व्यवसायातून वर्षाला सुमारे सव्वातीन काेटी इतकी उलाढाल हाेत आहे. रंगीबेरंगी माशांच्या दुनियेने,  ते पाळण्याच्या हौसेने तरुणांना राेजगाराचा एक नवा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

सकारात्मक ऊर्जा वाढते- पाण्याच्या दिशानिर्देशांमध्ये ॲक्वेरियम ठेवल्याने तेथील सकारात्मक ऊर्जा वाढते, असे सांगितले जाते. त्यामुळेही काही जण मासे पाळतात. - त्यासाठी याेग्य दिशा काेणती, हेही पाहिले जाते, तर काेणता मासा पाळणे चांगले, याचा अभ्यास करूनही मासे पाळले जातात.

यांना सर्वाधिक पसंती‘गाेल्ड फिश’ पाळायला अनेकांना आवडताे. त्यानंतर, आरवाना, फ्लाेरान किंवा फ्लाॅवर हाॅर्न, शार्क या माशांना अधिक मागणी आहे. अलीकडे एंजल हा मासाही अधिक पाळला जाताे.

मी २० वर्षे या व्यवसायात असून, अलीकडे मासे पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरीत मुंबईतून मासे आणले जातात. १५ ते २० दिवसांतून एकदा पाणी बदलावे. केवळ ७० टक्केच पाणी बदलावे.- राजेश नंदकुमार पाटील, व्यावसायिक, रत्नागिरी. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी