शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणाच्या योजनांपासून कामगार दूरच

By admin | Updated: July 18, 2014 23:13 IST

सर्वांसाठी लाभ : केवळ उच्चभ्रूसाठी योजना नको...

संजय सुर्वे - शिरगाव महाराष्ट्र शासनाने राज्यातील विभागनिहाय कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याची घोषणा नुकतीच केली. मात्र, साठ वर्षांपूर्वीपासून कार्यरत असलेल्या कामगार कल्याण मंडळाच्या कार्यक्षमतेकडे व कार्यपद्धतीमधील त्रुटींकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक योजना मोठ्या कंपनीतील कामगारांनाच लाभाच्या आहेत. कामगार कल्याण हा शब्दच तळागाळातील अनेक कामगारांना आजही ऐकून माहीत असल्याचे चित्र आहे. मंडळाकडून केवळ विविध कंपन्यांना माहीत व्हावे म्हणून कल्याण निधी भरण्याबाबत जाहिरात दिली जाते. तथापि कल्याण निधी न भरल्यास संबंधित कंपनीवर कोणतीच कारवाई होत नाही. अत्यल्प प्रमाणात असलेले कामगार कल्याण निरीक्षकांनाच कंपन्यांचे दफ्तर तपासण्याचे अधिकार आहेत. मात्र, छोट्या कंपन्यापर्यंत ते पोचतच नाहीत. पर्यायाने मालक व कामगारांनी वार्षिक दोनदा भरायची वर्गणी भरली नसेल तर शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, असाध्य रोग सहाय्य यातील काहीच त्याला मिळत नाही. २५ हजारांपेक्षा जास्त वेतन घेणारे कामगार कायम याचा लाभ उठवतात. मात्र, कंत्राटी कामगार अत्यल्प वेतन घेत असताना त्याचे कुटुंबीय या लाभापासून वंचित राहत आहेत हे वास्तव आहे. या महिन्यात शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करताना आपला मालक हा निधी भरत नसल्याचे कामगारांना समजले. पण, ज्या निमशासकीय मंडळांनी त्यांना कंत्राट दिले. त्यांनीही याबाबत अनास्था दाखवल्याची दुसरी बाजू पुढे आली आहे. आपल्या रोजगारावर गदा येईल म्हणून सगळेच गप्प राहतात. महाराष्ट्र कामगार मंडळाकडून सर्वाधिक कामगार संख्या अथवा औद्योगिक क्षेत्राचा सर्व्हे करुन कामगार कल्याण केंद्र सुरु करण्याची अपेक्षा कायम असते. पण, शासन दुर्लक्ष करते. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी पोफळी येथे ३५० कामगार कर्मचारी असताना स्वतंत्र कामगार कल्याण केंद्र सुरु आहे. तेथे कंत्राटी कामगारांचे कल्याण निधीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सभासद वाढत नाहीत. याउलट गाणे - खडपोली औद्योगिक वसाहतीत जे. के. फाईल्स, जे. के. तालाबोट, साफ ईस्ट, कृष्णा अ‍ॅण्टी आॅक्सिडंट, निप्रो ट्यूब ग्लासमधील कायम कामगार कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १ हजार आहे, तर कंत्राटी कामगार सातशेहून अधिक आहेत. तथापि या क्षेत्रात कामगार कल्याण केंद्र सुरु करण्याची हालचाल नाही. साहजिकच मंडळाच्या सगळ्या योजना उच्चभ्रू वस्तीतच अडकल्या आहेत. कामगार मंत्री असताना हुसेन दलवाई यांनी चिपळूण येथे गट कार्यालय व केंद्र सुरु केले. आता कोकणातील चिपळूणचेच कामगार मंत्री भास्कर जाधव आहेत. त्यांनी प्रत्यक्ष मंडळाच्या योजनांची अंमलबजावणी होण्यास दबाव आणला आणि कल्याण निधीबाबतच्या कार्य पद्धतीत सुधारणा केल्यास अनेक गरजू कामगारांना लाभ होईल, अशी चर्चा कामगार वर्तुळात आहे.