शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पथदीपांची कामे अर्धवटच

By admin | Updated: October 2, 2016 00:09 IST

योजनेची ‘ऐसी की तैसी’ : नवबौध्द, चर्मकार वाड्यावस्त्या अंधारात

रत्नागिरी : जिल्ह््यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द वाड्यावस्त्यांमध्ये पथदीप बसविण्याच्या योजनेचे महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे बारा वाजले आहेत. अनेक वाड्यांमध्ये पथदीप बसविण्यात आलेले नाहीत. तर काही वाड्यावस्त्यांमधील पथदीप बसविण्याची कामे अर्धवट सोडण्यात आल्याने या वाड्यावस्त्या अजूनही अंधारातच आहेत. गेली कित्येक दशके नवबौध्द आणि चर्मकारवाड्या, वस्त्या या अंधारात चाचपडत आहेत. या वाड्यावस्त्या पथदिव्यांच्या माध्यमातून उजळाव्यात, यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये पथदीप उर्जीकरण योजना सुरु केली. सन २०११ पासून गेली सहा वर्ष ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेच्या फायद्यापासून या वाड्यावस्त्या वंचितच राहिल्या आहेत. जिल्ह्यात बौध्दवाड्या व चर्मकारवाड्या आजही विकासापासून दूरच आहेत. या वाड्यावस्त्यांमध्ये आजही रात्रीच्यावेळी अंधारात चाचपडत जावे लागते. त्यासाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या वाड्यावस्त्यांना पथदीपांची सोय करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. सन २०११ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ९९ बौध्दवाड्या आणि चर्मकारवाड्यांच्या पथदीपांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत महावितरणकडे पाठविण्यात आले होते. या वाड्यावस्त्यांमध्ये सुमारे २०५९ पथदीप मंजूर करण्यात आले होते. हे मंजूर करण्यात आलेले पथदीप बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून महावितरणला लाखो रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये महावितरणने यातील काही वाड्यावस्त्यांमध्ये पथदीपांची कामे सुरु केली मात्र ती अर्धवट ठेवण्यात आली. तर अनेक वाड्यावस्त्यांमधील कामे अजूनही सुरु करण्यात आलेली नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या आहेत. महावितरणच्या अनागोंदी आणि बेजबाबदार कारभाराबद्दल समाजकल्याण समितीच्या सभेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. महावितरण आपल्या कारभारात कधी सुधारणा करणार? असा सवाल आता या वाडीवस्तीतील ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर) संताप : महावितरणची कामे खोळंबली तालुका वाड्या मंजूर दिवे दापोली १३ १७३ रत्नागिरी १२ २५८ संगमेश्वर २२ ३७४ चिपळूण १० ३३२ गुहागर ७ १५१ राजापूर ६ ७९ मंडणगड १४ १३० खेड ९ १३४ लांजा ५ ७५ एकूण ९९ २०५९