शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

सामंतांच्या कार्यालयावर प्रेरक धडकणार

By admin | Updated: July 1, 2014 00:13 IST

जाब विचारणार : रत्नागिरीत गुरुवारी करणार तीव्र आंदोलन

मार्लेश्वर : पाच जिल्ह्यात शिक्षण समृद्धी योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा निर्णय होवून ही योजनेच्या अमलबजावणीसाठीची प्रक्रिया पुढे सरकत नाही. याबाबत पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण समृद्धी प्रेरक संघटनेच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २ हजार प्रेरक पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील कार्यालयावर दि. ७ रोजी तीव्र आंदोलन छेडणार आहेत.शासनाने निरंतर शिक्षण केंद्र योजना अचानक बंद केल्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील सुमारे ७ हजार प्रेरकांवर उपासमारीची वेळ आली आहे.यानंतर या पाच जिल्ह्यातील प्रेरकांनी शासनाविरोधात वारंवार आंदोलने केली. या आंदोलनामुळे या पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय तत्वत: मान्य करण्यात आला. तसेच योजनेची अमलबजावणी तातडीने करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतर हे आश्वासन पाळण्यात आलेले नाही, असे या प्रेरकांचे म्हणणे आहे.याच काळात शिक्षण हक्काचा कायदा अस्तित्वात आला. यावेळी शिक्षण समृद्धी योजनेचा प्रस्ताव शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार द्यावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण समृद्धी प्रेरक संघटनेला दिल्या. यानुसार संघटनेने योजनेचा फेरप्रस्ताव शिक्षण मंत्रालयाला सादर केला. यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या संचालिका व्ही. राधा यांच्यासोबत या प्रस्तावावर चर्चाही झाली. या प्रस्तावावर निर्णायक बैठक घेवून त्याला अंतिम मान्यतेसाठी कॅबिनेटसमोर ठेवले जाईल, असेही ठरले.मात्र अद्यापही या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही व योजनेची अंमलबजावणीसुद्धा झालेली नाही. त्यामुळे गेले चार वर्ष सातत्याने संघर्ष करणाऱ्या प्रेरकांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.आता सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यानुसार संघटनेचे राज्य निमंत्रक कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयावर जिल्ह्यातील शिक्षण प्रेरक मोठ्या संख्येने मोर्चा काढणार आहेत.हा मोर्चा मारुती मंदिर ते जयस्तंभ असा निघणार आहे. सकाळी १०.३० वा. या मोर्चाला मारुती मंदिरपासून सुरुवात होणार आहे. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दत्तात्रय लिंगायत, श्रमिक मुक्ती दलाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र धावणे, उपाध्यक्ष उमेश कोलगे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते व संघटनेचे जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. (वार्ताहर)