शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला

By admin | Updated: May 13, 2016 23:52 IST

अडूर, कोंडकारूळ : आठ कोटींच्या पाणी योजनांचे भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

गुहागर : वर्षानुवर्षे पाण्यासाठी संघर्ष करावा लागणाऱ्या तालुक्यातील अडूर व कोंडकारूळ या गावांतील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा आमदार भास्कर जाधव यांनी कायमचा उतरविला आहे. या दोन्ही गावांसाठी अनुक्रमे ३.५० कोटी व ४.५० कोटींच्या पाणीयोजना त्यांनी राबविल्या आहेत. या दोन्ही योजनांचे उद्घाटन आमदार जाधव यांच्या हस्ते पार पडले. पाण्याचा प्रश्न कायमचा सुटल्याने यावेळी दोन्ही गावांमधील ग्रामस्थ व महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. वर्षानुवर्षे अडूर व कोंडकारूळ या गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. कोंडकारूळच्या महिलांना तर तीन-चार किलोमीटरची पायपीट करून रणरणत्या उन्हातून पाणी आणावे लागत होते. मतदार संघात फिरत असताना आमदार जाधव यांना हे विदारक चित्र पाहावयास मिळाले होते. पण, प्रत्यक्ष गावात पाण्याचा उद्भव नसल्याने पाणीयोजना राबविणे शक्य नव्हते. या गावांची तहान भागविण्याचा एकच पर्याय होता, तो म्हणजे सुमारे साडेचार किलोमीटरवर असलेल्या नागझरी येथील पाणी आणणे. एवढ्या लांबून पाणी आणण्यासाठी कोट्यवधी रुपयांची आवश्यकता होती. शासनाकडे पाठपुरावा करून आमदार जाधव यांनी या दोन गावांच्या स्वतंत्र पाणी योजनांसाठी अनुक्रमे ३.५० कोटी व ४.५० कोटी असे एकूण ८ कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्यातून या दोन्ही योजना आज पूर्णत्वास गेल्या आहेत.या योजनांचे उद्घाटन भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जाधव म्हणाले की, अडूर आणि कोंडकारूळच्या महिलांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. या गावांमधील पाण्याचे हाल मी स्वत: पाहिले होते. त्याचवेळी मी शब्द दिला होता की, तुमच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा मी उतरवेन, तुमची पाण्यासाठीची वणवण थांबवेन, असे सांगितले होते. या दोन्ही गावांतील कार्यक्रमांना विलास वाघे, सुनील जाधव, पूर्वा ओक, पांडुरंग कापले, सुरेश सावंत, रामभाऊ शिगवण, शैलजा गुरव, उमेश आरस, प्रशांत पोळेकर, जयदेव मोरे, नवनीत ठाकूर, शामराव दिवाळे, यशवंत धावडे, प्रवीण ओक, एकनाथ हळये, प्रमोद हळये उपस्थित होते. (प्रतिनिधी)