शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या मतदानात महिलांची टक्केवारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 15:58 IST

राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे आता मतदानातही महिलांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र राखीव ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरीसह इतर पाच विधानसभा मतदार संघात असलेल्या सखी मतदान केंद्रे आकर्षणाचा विषय ठरली. रत्नागिरीतील देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्र सुशोभित करण्यात आले होते. या केंद्रात ५६.३७ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्र सुशोभित सखी मतदान केंद्र ठरले साऱ्यांच्याच आकर्षणाचा विषय

रत्नागिरी : राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे आता मतदानातही महिलांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र राखीव ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरीसह इतर पाच विधानसभा मतदार संघात असलेल्या सखी मतदान केंद्रे आकर्षणाचा विषय ठरली. रत्नागिरीतील देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्र सुशोभित करण्यात आले होते. या केंद्रात ५६.३७ टक्के मतदान झाले.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या तीन विधानसभा मतदार संघांचा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या सहा विधानसभा मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या १४ लाख ४० हजार इतकी आहे. त्यापैकी सात लाख ३५ हजार ५९७ महिला मतदार आहेत. तर उर्वरित ७ लाख ६ हजार ३१८ पुरूष मतदार आहेत.एकूण लोकसंख्येचा विचार करता महिलांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर मतदारांमध्येही महिलांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कुठल्याही निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे मत निर्णायक ठरत असते. महिला मतदारांची संख्या प्रत्यक्ष मतदानावेळी वाढलेली दिसावी, यासाठी ही निवडणूक आयोगाने महिला मतदारांसाठी विविध सुविधा देऊ केल्या आहेत.याचाच एक भाग म्हणुन महिला मतदारांना आकर्षित करून घ्यावे, या हेतुने प्रत्येक यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले. शहरातील माळनाका भागात असणाऱ्या अ. आ. देसाई हायस्कूल येथे सखी मतदान केंद्र सुरु करण्यात आले होते. या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्षासह सर्व कर्मचारी महिला नेमण्यात आलेल्या होत्या. या केंद्रावर दिव्यांगांच्या मदतीसाठीही महिला स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली होती. संपूर्ण मतदान केंद्राला गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या फुग्यांची सजावट करण्यात आली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गWomenमहिला