शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

रत्नागिरीत महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 23:54 IST

रत्नागिरी : शरीरसौष्ठव स्पर्धा म्हटल्या की, पुरूषांची मक्तेदारी. यापूर्वी या स्पर्धा पुरूषासाठी सिमित होत्या. मात्र, या स्पर्धेतही महिलांनी शिरकाव ...

रत्नागिरी : शरीरसौष्ठव स्पर्धा म्हटल्या की, पुरूषांची मक्तेदारी. यापूर्वी या स्पर्धा पुरूषासाठी सिमित होत्या. मात्र, या स्पर्धेतही महिलांनी शिरकाव केला आहे. अन्य खेळाप्रमाणेच या खेळाकडे पाहावे. त्यासाठी पिळदार शरीरयष्टीकडे लक्ष केंद्रित करून स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी पुढे यावे. अद्याप ही संख्या सिमित असली तरी ती वाढण्याची अपेक्षा आहे, अशी अपेक्षा ‘मिस् इंडिया’ विजेती शरीरसौष्ठवपटू हर्षदा पवार हिने व्यक्त केली.खडीओझरे (ता. संगमेश्वर) गावातील हर्षदा संतोष पवार हिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करून मिस् मुंबई, मिस् महाराष्ट्र, मिस् इंडिया या स्पर्धेत बहुमान पटकाविला आहे. रत्नागिरीत कार्यक्रमासाठी आली असता तिने ‘लोकमत’शी संवाद साधला. आई-वडिल, भावाचा पाठिंबा असल्यामुळेच यश संपादन केल्याचे ती म्हणाली. विजेंद्र ठसाळे यांचे मार्गदर्शन लाभत असून, त्यांनीच स्पर्धा व स्पर्धेतील सादरीकरणाबाबत माहिती देऊन तयारी करवून घेतल्याचे सांगितले.आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय, महाराष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग नाममात्र आहे. त्या तुलनेत परदेशी महिलांचा सहभाग अधिक आहे. परदेशात स्पॉन्सरशीप मिळते. मात्र, भारतात त्याचा अभाव आहे. खर्चिक खेळ असल्याने महिला खेळाडूंनाही आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेत महिलांनी न घाबरता आत्मविश्वासाने सहभागी होणे आवश्यक आहे. जिद्द, चिकाटीने यश नक्कीच आत्मसात करता येते, असेही हर्षदा म्हणाली.हर्षदाला भविष्यात एशिया, जागतिक स्पर्धेत खेळायचं आहे. गतवर्षी दुबईत झालेली जागतिक स्पर्धा आर्थिक पाठबळाअभावी रखडल्याची खंत आहे. खासगी नोकरी करून आई,वडिल, भाऊ, मित्रमंडळींच्या पाठबळावर तिने पुन्हा जागतिक स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. दररोज न चुकता सायंकाळी तीन ते चार तास तयारी करीत आहे. याशिवाय ‘डायट’वर ही तिचे लक्ष आहे. एशिया, जागतिक स्पर्धेतील यश हेच तिचे ध्येय आहे.