शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील महिलांकडून दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:34 IST

चिपळूण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचे पडसाद चिपळुणात उमटले आहेत. जिल्हा राष्ट्रवादी युवती ...

चिपळूण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचे पडसाद चिपळुणात उमटले आहेत. जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे प्रवीण दरेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी महिलांनी दरेकर यांची प्रतिमा असलेला फोटो फाडला, तसेच तहसीलदारांना निवेदन देत दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण दरेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

प्रवीण दरेकर यांनी राज्यातील महिलांचा अपमान केला आहे. टीका करताना दरेकर यांची जीभ घसरली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात नेहमीच महिलांचा आदर केला जात आहे. मात्र, दरेकर यांनी केवळ प्रसिद्धीसाठी महिलांना उद्देशून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. त्यामुळे दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर माफी मागावी, तसेच पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांची बदनामी करणाऱ्या दरेकरांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष जान्हवी फोडकर, जिल्हा सचिव प्रणिता घाडगे, कार्यकारिणी सदस्य नमिता विचारे, अंकिता सुतार, युक्ता कदम आदींची उपस्थिती होती.