शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri news: 'माहेर'मुळे 'ती'ला मिळालं हक्काचं घर अन् माणसं 

By शोभना कांबळे | Updated: March 15, 2023 16:59 IST

पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक संबंधित महिला निराधार, मळकट कपड्यात आढळून आली होती

रत्नागिरी : भटकत असलेल्या महिलेला येथील माहेर संस्थेच्या प्रयत्नामुळे मानसिक आजारावर उपचार मिळाले. ती बरी झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यानंतर तिला हक्काचे घर व माणसे मिळाली. तिच्या पतीने संस्थेत येऊन या महिलेला आपल्या घरी नेले.रत्नागिरी येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर या संस्थेमध्ये अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित मुले- मुली महिला, पुरुष दाखल होत असतात. रस्त्यावर फिरणाऱ्या, नातेवाईक नसणाऱ्या, मानसिक विकार असलेल्या महिला संस्थेत दाखल होऊन औषध उपचाराने बरे होतात. नोव्हेंबर २०२२ मध्ये माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे पुण्यावरून येत असताना पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक एक निराधार, मळकट कपड्यातील महिला दिसली. त्यांनी तिची विचारपूस करून औषध उपचार व निवाऱ्याची गरज ओळखून माहेर संस्थेच्या गाडीतून संस्थेत दाखल केली. तिचे पुढील उपचार ओपीडी बेसवर रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात करण्यात आले. पाच महिन्यात ही महिला बरीही झाली व तिने आपले नाव येसाबाई दगडू एकशिंगे (भुयेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर) असे सांगितले. या पत्त्यावर चौकशी केली असता येसाबाई एकशिंगे यांचे पती यांनी येसाबाई ही आपली पत्नी असल्याचे सांगितले.गेली पाच सहा महिने ती घरातून बाहेर पडली आहे. तसेच ती मानसिक विकाराने ग्रस्त असल्याने गाव सोडून बाहेर जाते  परंतु पुन्हा ती घरी येते. परंतु यावेळी खूप दिवस झाले ती घरी आलीच नाही म्हणून आम्ही खूप चिंतेत होतो. आम्ही तिचा खूप शोध घेत होतो. परंतु ती सापडली नाही, असे सांगितले. येसाबाईलाही घरी जाण्याची ओढ लागली होती. त्यांचे पतीने माहेर संस्था हातखंबा येथे येऊन येसाबाई शिंदे यांना सुखरूप आपल्या ताब्यात घेतले. माहेर संस्थेमुळे एका निराधार भटकणाऱ्या महिलेला आपले घर मिळाल्याने खूप समाधान वाटले असे माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी