पनवेल ते झाराप या ४५० किलोमीटरच्या रुंदीकरणाचे काम रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यांत सुरू आहे. त्यापैकी इंदापूर ते झाराप हे ३६६.१७ किलोमीटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी पायथा ते राजापूरपर्यंतच्या रुंदीकरणाचा समावेश आहे.
..........
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १९८.५ किलोमीटर लांबीपैकी ९०.१७ किलोमीटरचे काम जून २०२१ अखेर पूर्ण झाले आहे. उर्वरित १०८ किलोमीटरपैकी २५ किलोमीटर लांबीचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, २३.३६ किलोमीटरचे काम जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यापुढील ६० किलोमीटरचे रुंदीकरण डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
...........
या महामार्गावर मोठे पूल २४ असून, त्यापैकी १३ पूर्ण झाल्या असून, १० चे काम सुरू आहे. राजापुरातील पुलाचे काम यातून वगळण्यात आले आहे. लहान पूल ८५ असून, त्यापैकी ५४ पुलांचे काम पूर्ण झाले असून, ३१ पुलांचे काम सुरू आहे. १५८७ मोऱ्यांपैकी ९२८ पूर्ण झाल्या असून, ६५९ मोऱ्यांचे काम सुरू आहे. या कामांना डिसेंबर २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
......
कशेडी घाटातील १.८४ किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी १.७५ किलोमीटर लांबीचे खोदकाम झाले असून, उर्वरित काम जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
.......
राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरीकडून १४३.११ काेटींचे निवाडे रस्ते परिवहन मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, हे निवाडे अजूनही प्रलंबित असून, निधीही अद्याप या मंत्रालयाकडून मिळालेला नाही.