शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 16:08 IST

कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगितले.

ठळक मुद्देसंपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणेराज्यातील भ्रष्ट नगर परिषदांच्या यादीत रत्नागिरीही

रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगितले.रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुकीत निवडणूक रिंगणात असलेले भाजप उमेदवार अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या प्रचारासाठी राणे रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात गेल्या १० ते १५ वर्षांत अनेक शहरे उदयाला येऊन भरभराटीला आली. त्या शहरांमध्ये कारखानदारी आली. व्यापार वाढला. नवीन वसाहती उभ्या राहिल्या. त्या शहरांना ज्या मुख्य १८ सुविधा आवश्यक होत्या त्या पुरविल्या गेल्या.

राज्यात अशी अनेक शहरे आहेत. परंतुु रत्नागिरी इतके जुने व ऐतिहासिक शहर असूनही येथील तरुणांच्या हाताला रोजगार, नवीन उद्योग येथे आले नाहीत. भुयारी गटार योजना नाही. प्रत्येक प्रभागांमधील उघड्या गटारांमुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. डासांचा उपद्रव मोठा आहे. अतिशय निसर्गरम्य शहर असूनही येथे रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य अशा १८ चांगल्या नागरी सुविधांसह हे शहर स्वच्छ सुंदर बनविता आले असते. पण शिवसेनेकडून काहीच झाले नाही.रत्नागिरी शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का, नागरिकांना सुरक्षितता आहे का, याचा विचार करता नगर परिषदेतील शिवसेनेचे नेते याला जबाबदार आहेत. मुंबई ही देशातील सर्वात भ्रष्ट महानगर पालिका म्हणून ओळखली जाते, त्याचप्रमाणे राज्यातील भ्रष्ट नगर परिषदांच्या यादीमध्ये रत्नागिरी नगर परिषदेचे नावही आहे. त्यामुळे या शहराचा कायापालट करायचा असेल तर जनतेने मतांचे परिवर्तन करावे, भाजपचे उमेदवार पटवर्धन यांना संधी द्यावी, असे आवाहन राणे यांनी केले.रत्नागिरी शहर विकासाच्या बाबतीत मागे राहिले, याला येथे अनेक वर्षे असलेली शिवसेनेची सत्ता हे कारण आहे. येथील नगर परिषद व जिल्हा परिषद अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. तरीही शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. १८ नागरी सुविधांसह रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर बनविता आले असते. परंतु या नगर परिषदेमध्ये सत्तेत बसलेल्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केले नाही. कारभार करणारे तेवढे धनाढ्य झाले, असा घणाघाती आरोपही राणे यांनी केला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Ratnagiriरत्नागिरी