शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खान, शाहरुख खान कुठे आहेत?; दीपाली सय्यद यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 23:20 IST

चिपळूणला माझं घर म्हणून आवश्यक असलेली सर्व मदत मी करेन, असेही त्यांनी सांगितले.

चिपळूण : मराठी चित्रपटांपेक्षा आपण हिंदी चित्रपटांना झुकते माप देतो. पण जेव्हा आपत्ती येतात, तेव्हा ते मदतीला येतात का? कुठे आहेत सलमान खान, शाहरुख खान? असा प्रश्न अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला.  आपण मराठी चित्रपट सृष्टीला ताकद दिली, तरच मराठी कलाकार तुमच्या मदतीला येऊ शकतील, असेही त्या म्हणाल्या.

महापुरात चिपळूणचे अतोनात नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी त्या सोमवारी चिपळूणमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे मत मांडले. मराठी चित्रपटांना आपण पाठबळ देत नाही. त्यांना थिएटर्सही मिळत नाहीत. त्यांनी मदत करण्यासाठी बाहेर पडावे, अशी अपेक्षा असेल तर त्यासाठी त्यांना लोकांनी पाठबळही द्यायला हवे. आपण हिंदी चित्रपटांना जेवढा मानसन्मान देतो, तेवढा आपण मराठीला देतो का? असा प्रश्न त्यांनी केला.

आपण वाशिष्ठी नदीकाठच्या भागात पाहणी केली. तेथे आतापर्यंत कोणीही पोहोचलेले नाहीत. तेथील परिस्थितीचा आपल्याला अंदाज आला आहे. नुकसानाचे पंचनामे घेऊन आपण लवकरच तेथे मदत देऊ, असे त्या म्हणाल्या. माझं माहेर चिपळूण तालुक्यातील पोफळी शिरगाव येथे आहे. त्यामुळे चिपळूणला माझं घर म्हणून आवश्यक असलेली सर्व मदत मी करेन, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Salman Khanसलमान खानShahrukh Khanशाहरुख खानchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढा