शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

राणे पिता-पुत्रांनी मच्छीमारांसाठी काय केले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:57 IST

दामोदर तांडेल यांचा आरोप

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. २२ : अनेक वर्षे सत्तेत असताना व एकवेळा मुख्यमंत्री असतानाही कॉँग्रेस नेते नारायण राणे यांनी मच्छीमारांसाठी कोणतीही योजना राबवली नाही. खासदार असताना नीलेश राणेंना मच्छीमारांसाठी केंद्राच्या योजनेतून निधी आणता आला नाही. आमदार नीतेश राणे यांना मच्छीमारांचा आताच पुळका का आला? अधिकाऱ्यांवर मासे फेकणे, ही निव्वळ स्टंटबाजी आहे, असा हल्लाबोल अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी येथे केला. सागरी मच्छीमार संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त येथील खारवी समाज भवनात आयोजित मच्छीमार मेळाव्यात तांडेल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो, समितीचे मुंबई जिल्हाध्यक्ष दिगंबर वैती, ठाणे जिल्हाध्यक्ष माल्कम कासेकर, सागरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर लोकरे, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, सचिव सुधीर वासावे, खजिनदार मुश्ताक मुकादम, समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष खलील वस्ता, भगवान खडपे, जिल्हा उद्योग केंद्राचे विजय पवार, संजय पावसकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तांडेल म्हणाले, परप्रांतीय नौका, पर्ससीन नौकांच्या विरोधात नीतेश राणे यांनी आंदोलन केले, याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, हे त्यांना आताच का सुचले. याआधी का सुचले नाही, त्यांनी मच्छीमारांच्या बाजूने आधीपासून हा प्रामाणिकपणा का दाखवला नाही, असे सवाल करीत राणे पिता - पुत्रांनी मच्छीमारांसाठी आजवर काहीही केलेले नाही. मच्छीमारांनी आपल्यामागे यावे, यासाठीच आता उमाळा आला आहे, असा टोला तांडेल यांनी लगावला. यावेळी नौका दुरुस्तीच्या अभ्यासक्रमाबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी विजय पवार यांनी माहिती दिली. सागरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर लोकरे म्हणाले, मच्छीमार खलाशांना नौकामालकांनी करारपत्र करून दिले पाहिजे. यावेळी पर्ससीन व पारंपरिक मच्छीमारीचा विषय योग्यरित्या हाताळायला हवा, असे मुश्ताक मुकादम म्हणाले. प्रदूषणकारी प्रकल्पांच्या सांडपाण्यामुळे मत्स्यजीवन धोक्यात आले आहे, असे सुधीर वासावे म्हणाले. कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो म्हणाले, कामगारांना निवृत्तिवेतन मिळते. सरकार व संघटनेच्या माध्यमातून मच्छीमारांना निवृत्तिवेतन देता येईल.