शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नळपाणी योजना दीड वर्षात पूर्ण करू

By admin | Updated: March 8, 2017 14:00 IST

राहुल पंडितांची माहिती : योजनेतील त्रुटी दूर करण्यात राऊत, सामंतांची महत्त्वाची भूमिका

नळपाणी योजना दीड वर्षात पूर्ण करूराहुल पंडितांची माहिती : योजनेतील त्रुटी दूर करण्यात राऊत, सामंतांची महत्त्वाची भूमिकारत्नागिरी : रत्नागिरी शहरासाठी ६१ कोटी ९ लाख २७ हजार ६१६ रुपये खर्चाची सुधारित नळपाणी योजना ही पुढील २० ते २५ वर्षांतील शहराचा विस्तार लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. शासनाने मंजुरी दिलेल्या या योजनेतील अनेक त्रुटी दूर करून ही योजना मार्गी लावण्यात खासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांची प्रमुख भूमिका आहे. त्यांच्यामुळेच या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. येत्या दीड वर्षांत ही योजना पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, आरोग्य समिती सभापती स्मितल पावसकर उपस्थित होते. या योजनेचा पहिल्या टप्प्यातील १७ कोटी निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पुढील निधी मिळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, खासदार राऊत व राज्य शासनाच्या अंदाज समितीचे सभापती आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुुळे या योजनेतील संभाव्य अडथळे आता दूर झाले आहेत. या योजनेतून सर्वप्रथम शीळ धरणापासून साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रादरम्यानची साडेआठ किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलली जाणार आहे. सध्याची वाहिनी खराब झाल्याने पाणी गळतीचे, जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण अधिक आहे. ही समस्या नवीन जलवाहिनीमुळे सुटेल व पाण्याची गळती थांबून रत्नागिरीकरांना पुरेसे पाणी मिळेल. रत्नागिरीतील साठवण टाक्या, शहरातील पाणी वितरण जलवाहिन्यांचे खराब झालेले जाळे बदलणे, नाचणे व साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रांचे आधुनिकीकरण करणे, पानवल धरणाची नव्याने उभारणी, पानवल धरणापासून नाचणे जलशुध्दिकरण प्रकल्पापर्यंतची जलवाहिनी बदलणे, पाणीपुरवठ्याच्या चांगल्या सुविधा निर्माण करणे, यासारखी कामे या सुधारित नळपाणी योजनेत प्राधान्याने होणार आहेत. (प्रतिनिधी)वाहतुकीबाबत सर्वसमावेशक बैठक घेणारटोर्इंग केलेल्या वाहनांसाठीची जागा नगर परिषदेची आहे. या जागेच्या प्रवेशद्वाराला नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार कुलुप लावण्यात आले होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांबरोबर झालेल्या चर्चेनंतर ही जागा टोर्इंग केलेली वाहने ठेवण्यासाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहरातील वाहनधारक, व्यापारी, फेरीवाले तसेच अन्य घटकांच्याही काही समस्या आहेत. त्यामुळे लवकरच वाहतुकीबाबत सर्वसमावेशक बैठक घेऊ.